दीपवीरने शेअर केले रोमँटिक फोटो (Pictures From ...

दीपवीरने शेअर केले रोमँटिक फोटो (Pictures From Deepika-Ranveer’s Romantic Anniversary Trip Go Viral)

केवळ पडद्यावरच नाही तर व्यक्तिगत आयुष्यातही एकमेकांत उत्तम केमिस्ट्री असलेले दीपिका आणि रणवीर सिंह हे जोडपं बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि क्युट जोडपं म्हणून ओळखलं जातं. नुकतेच या उभयतांनी आपल्या लग्नाचा तिसरा वाढदिवस उत्तराखंड या ठिकाणी अतिशय रोमँटिक पद्धतीने साजरा केला. दीपिका आणि रणवीरने चाहत्यांसाठी त्यांच्या या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. विशेष म्हणजे चाहत्यांनीही या फोटोंना भरभरून पसंती दर्शविली आहे.

दीपिका आणि रणवीरने १४ आणि १५ नोव्हेंबर २०१८ मध्ये इटलीत डेस्टिनेशन वेडिंग केले होते. त्यानंतर त्यांनी बेंगळूरु आणि मुंबई अशा दोन ठिकाणी रिसेप्शन्स ठेवली होती. या दोघांचा लग्नसोहळा अतिशय स्मरणीय असाच होता. या लग्नसोहळ्याने चाहत्यांना अक्षरशः वेडे केले होते आणि त्यांच्यातील प्रेम पाहून चाहत्यांनीच त्यांच्या जोडीला दीपवीर असे नाव दिले आहे.

आता नुकतेच या दोघांनी त्यांच्या लग्नाचा तिसरा वाढदिवस उत्तराखंडमधील देहरादून येथे साजरा केला असून दीपिकाने त्यांच्या सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. या सर्व फोटोंमधून दीपवीर यांच्यातील उत्तुंग प्रेमाची प्रचिती येते. दीपिकानेही तिच्या इन्स्टाग्रामवर देहरादूनमधील त्यांचे काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना दीपिकाने लिहिले की, ‘माझं पूर्ण हृदय’ या फोटोमध्ये दीपिका रणवीरला किस करताना दिसत आहे.

दीपवीरने जे फोटो शेअर केले ते काही मोनोक्रोम इफेक्टमध्ये आहे तर काही रंगीत आहेत. हे फोटो त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडले असून ते भरभरून कमेन्ट करत आहेत. रणवीर दीपिकाने त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो क्षणार्धात व्हायरल झाले आहेत. अन्‌ दीपिकाने तिच्या सर्व फोटोंचे क्रेडिट पतिदेव रणवीर सिंहला दिले आहे.

रणवीर सिंगच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याचा ‘८३’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. हा चित्रपट १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट विश्वचषक जिंकला यावर आधारित आहे. यामध्ये रणवीरने कपिल देव यांची भूमिका साकारली आहे, जो त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार होता आणि दीपिका पादुकोणने त्याला पत्नी रोमीच्या भूमिकेत साथ दिली आहे. या व्यतिरिक्त रणवीरचे सर्कस, जयेशभाई जोरदार आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी यांसारखे अनेक मजेदार आणि अप्रतिम चित्रपटही पुढील वर्षी पाहायला मिळणार आहेत. त्याचप्रमाणे दीपिका पादुकोणच्याही हातात अनेक कामे आहेत. सिद्धांत चतुर्वेदी आणि अनन्या पांडेसोबत शकुन बत्राचा चित्रपट, हृतिक रोशनसोबतचा फायटर आणि हॉलीवूड चित्रपटावर आधारित चित्रपटातही ती काम करते आहे. अर्थात लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दोघांनी त्यांच्या व्यस्त दिनक्रमातून एकमेकांसाठी हा वेळ काढला आहे.