‘गंगुबाई काठियावाडी’ वरील संकट टळले...

‘गंगुबाई काठियावाडी’ वरील संकट टळले : याचिका फेटाळल्या (Petitions Against ‘Gangubai Kathiyawadi’, Dismissed By Court : Film To Release Without Any Hurdle)

संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटातील मुंबईच्या कामाठीपुरा या विभागाचा उल्लेख वगळण्याची मागणी करणाऱ्या दोन याचिका उच्च न्यायालयाने काल फेटाळल्या. त्यामुळे सदर चित्रपट उद्या प्रदर्शित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कांग्रेसचे आमदार अमीन पटेल व इतर रहिवासी  यांनी सदर याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर चित्रपटाची झलक पाहून हरकत घेण्याऐवजी चित्रपट पूर्ण पाहायला हवा होता. शिवाय या चित्रपटात ज्या कालखंडाचे चित्रण करण्यात आले आहे, त्याचा देखील विचार व्हायला हवा, असा युक्तीवाद निर्मात्यांतर्फे केला गेला. तो ग्राह्य मानून उच्च न्यायालयाने दोन्ही याचिका फेटाळल्या. त्यामुळे आता सदर चित्रपटाची अडथळ्यांची शर्यत संपली, असे मानायला हरकत नाही.