परफॉर्मन्स डोक्यात असावा लागतो… (Performance ha...

परफॉर्मन्स डोक्यात असावा लागतो… (Performance has to be in the head… – Short Story)

रीहा बुलोज. वय फक्त ११. देश फिलीपाईंस. मुलीची गेली दोन वर्ष भुणभुण…बाबा मला रनींगचे शूज आणा..  बाबांचे एकच उत्तर ..शक्य नाही .., परवडत नाही. म्हणता म्हणता ..देशस्तरावर शालेय स्पर्धा जवळ आली..  ही ..फायनल राऊंडला गेली. सर्व स्पर्धक हायफाय शूज मधे..  हिच्याकडे शूज नव्हतेच मुळी…मग जखमेवर लावायच्या पट्ट्या बुटासारख्या ..पायावर लावल्या..  त्यावर पेनाने लिहले..NIKE  आणि जीव तोडून पळाली…. 

४००/८००/१५००  तीनही गोल्ड मेडल्स खिशात….  तिचे पेनाने लिहिलेले पट्टी शूज फेमस झाले.. NIKE कंपनीने दखल घेतली..  आणि … चक्क तिचा पूर्ण खर्च कायमस्वरूपी करायची तयारी दर्शवली.  परफॉर्मन्स डोक्यात असावा लागतो ….शूज मध्ये नाही… अभ्यास डोक्यात भिनलेला असावा लागतो, पुस्तकात नाही. आपण प्रथम मनात ठरवावे लागते.. मला हे निभावायचे का नाही..  नाहीतर..

हजारो रुपयांचे बुट आणले की प्रॅक्टिस सुरू करण्याचा निश्चय करणारे,

लाखो रुपयांचे क्लासेस लावले की मग अभ्यास सुरू करणार, असा निश्चय करणारे

अगोदर महागडा वजन काटा आणून मग डाएटिंग सुरू करण्याचा निश्चय करणारे

हजारो रूपयांची इक्विपमेंट्स विकत घेऊन नुसत्याच पोकळ निश्चयाचे महामेरू ?