‘लोक मेहनतीची कदर करत नाही’- ‘शमशेरा’च्या अपयशा...

‘लोक मेहनतीची कदर करत नाही’- ‘शमशेरा’च्या अपयशाबद्दल संजय दत्तची नाराजी (‘People show indifference to our efforts’- sanjay dutt express his displeasure on ‘shamshera’s failure)

अभिनेता रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असणारा शमशेरा काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. रणबीर 4 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतला आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना या चित्रपटाकडून खूप अपेक्षा होती. पण या चित्रपटाला पाहिजे तसे यश मिळाले नाही. करण मल्होत्रा दिग्दर्शित हा चित्रपट 150 कोटी रुपये एवढ्या प्रचंड बजेटमध्ये बनला होता. या चित्रपटात रणबीर कपूरसोबत वाणी कपूर, संजय दत्त यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका होत्या. या कलाकारांनी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन केले होते. पण तरीही त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यासंदर्भात अभिनेता संजय दत्तने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत नाराजी व्यक्त केली. इन्स्टाग्रामवर एक लांबलचक नोट शेअर करत त्याला शमशेरा आमचा आहे असे कॅप्शन दिले. संजय दत्तने त्या पत्रात म्हटले की,

चित्रपट म्हणजे  कथा, आपल्याला यापूर्वी कधीही न भेटलेली पात्रे जिवंत करण्यासाठी कृती.  शमशेरा ही त्याचेच एक उदाहरण आहे. जे साकारायला आम्ही आमचे सर्व काही दिले. हा एक रक्त, घाम आणि अश्रूंनी बनलेला हा चित्रपट आहे.  हे एक स्वप्न आहे जे आम्ही पडद्यावर आणले आहे. चित्रपट प्रेक्षकांना आवडण्यासाठी बनवले जातात. प्रत्येक चित्रपटाला त्याचे प्रेक्षक लवकर किंवा नंतर भेटतात.  शमशेराचा तिरस्कार करणारे बरेच लोक आढळले;  काही प्रमाणात द्वेष अशा लोकांकडून आला ज्यांनी तो पाहिला देखील नाही.  मला हे भयंकर वाटते की आपण सर्वांनी केलेल्या मेहनतीची लोक कदर करत नाहीत.

एक चित्रपट निर्माता म्हणून करणची प्रशंसा करा, पण मुख्यतः एक व्यक्ती म्हणून अवश्य करा. माझ्या चार दशकांच्या कारकिर्दीत मी काम केलेल्या सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी तो एक आहे. जीवाभावाची पात्रे तयार करण्याचा त्याचा हातखंडा आहे.  आम्ही अग्निपथमध्ये सोबत काम केलेले, जिथे त्याने मला कांचा साकारायला दिला.  त्याच्यासोबत काम करण्याचा अनुभव फारच कमाल होता. त्यानंतर त्याने शमशेरासाठी माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवला आणि हा चित्रपट आम्ही बनवला आणि शुद्ध सिंगला पडद्यावर जिवंत केले.

  करण माझ्यासाठी माझ्या कुटुंबातीलच एक आहे. मी नेहमीच यश किंवा अपयश बाजूला ठेवून त्याच्यासोबत काम करीन आणि सदैव त्याच्या पाठीशी उभा राहीन.  शमशेराला त्याची टोळी कधीतरी सापडेल पण तोपर्यंत मी हा चित्रपट, आम्ही निर्माण केलेल्या आठवणी, आम्ही तयार केलेले नाते, आम्ही तयार केलेले आनंदी क्षण, आम्ही ज्या त्रासातून गेलो त्यासाठी खंबीर उभा राहीन.

 मी या चित्रपटाच्या संपूर्ण युनिट, कास्ट आणि क्रू जे या चित्रपटासाठी आमच्यासोबत 4 वर्षे राहिले त्यांचे आभार मानतो. या चित्रपटामुळे मध्यंतरीच्या महामारीच्या काळात तसेच माझ्या स्वत:च्या वैयक्तिक कठीण काळात माझे आणि रणबीरचे खास नाते तयार झाले आहे. त्याची कलाकुसर आणि भावनिकतेची पडद्यावर चित्रण करण्याची क्षमता ही उत्कृष्ट आहे. सध्याच्या काळातील सर्वात मेहनती आणि हुशार अभिनेत्यांपैकी एक असलेल्या कलाकाराच्या कामावर लोक द्वेष निर्माण करण्यास किती उत्सुक आहेत हे पाहून वेदना होतात.  आमच्यासाठी कला आणि आमची बांधिलकी आमच्या वाटेवर येणाऱ्या द्वेषाच्या पलीकडे आहे. आम्हाला चित्रपट आणि त्यातील लोकांबद्दल प्रेम वाटते बाकी सर्व काय लोक नाव ठेवतच राहतील त्यांचे कामच आहे नाव ठेवणे !