लग्नाआधीच पायल रोहतगीचे होणाऱ्या नवऱ्यासोबतचे र...

लग्नाआधीच पायल रोहतगीचे होणाऱ्या नवऱ्यासोबतचे रोमॅण्टिक फोटो झाले व्हायरल.. (Payal Rohatgi’s Romantic Pre-Wedding Photoshoot With Sangram Singh, Couple To Tie The Knot On 9th July)

कंगणा रणावतच्या लॉक अप या शोमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री पायल रोहतगी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. पायल रेसलर असलेल्या संग्राम सिंहसोबत ९ जुलैला लग्न करणार आहे. हे लग्न अत्यंत साधेपणात पार पडेल. लग्नापूर्वी या जोडीने प्री वेडींग शूट केले आहे. त्यांचे ते फोटो सोशल मीडियावर सध्या खूप व्हायरल होत आहे.

या दोघांनी आग्रा येथे प्री वेडींग शूट केले. त्या फोटोंमध्ये दोघेही खूप रोमॅण्टिक अंदाजात दिसत आहेत. पायलने नुकतेच त्यांच्या प्री वेडींगचे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले. त्यांचे फोटो पाहून चाहते कपल गोल म्हणून कमेंट करत आहेत.

संग्रामबद्दल बोलताना पायल म्हणाली की, संग्राम अजिबात रोमॅण्टिक नाहीत. त्यामुळे त्यांना रोमॅण्टिक मूडमध्ये आणणे सोप्पी गोष्ट नव्हती. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत पायलने या प्री वेडींग शूट करण्यामागचे कारण सांगितले. ती म्हणाली, मला संग्रामला शेरवानी आणि सूट या कपड्यांमध्ये पोज द्यायला शिकवायचे होते. संग्राम जराही रोमॅण्टिक नाहीत. ते रेसलर आहेत त्यामुळे त्यांना शॉर्टस् मध्येच खूप कम्फर्टेबल वाटते. म्हणूनच मला त्यांना शेरवानी सूट यांसारख्या कपड्यांची सवय लावायची होती. जेणेकरुन ते कॅमेऱ्यात त्या कपड्यांमध्ये पोज द्यायला शिकतील. त्यामुळेच मी ते फोटोशूट प्लॅन केले होते.

पायल रोहतगी आणि संग्राम सिंहचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांचे चाहते सुद्धा ‘ब्यूटीफुल कपल’, ‘बेस्ट कपल’ अशा कमेंट करुन त्यांचे कौतुक करत आहेत.

पायल आणि संग्राम 9 जुलैला कुटुंबिय आणि जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थितीत आग्रा येथे लग्नगाठ बांधणार आहेत. सुरुवातीला २१ जुलै ही लग्नाची तारीख ठरली होती पण नंतर ती बदलून ९ जुलै करण्यात आली.

पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांचा २०१४ मध्येच साखरपुडा झाला होता. बरीच वर्षे ते एकमेंकाना डेट करत होते पण त्यांचे लग्न कोणत्या ना कोणत्या कारणाने पुढे ढकलले जात होते. याबाबतचा खुलासा पायलने लॉक अप शोमध्ये केला होता. त्यानंतर संग्रामने पायलचा एक व्हिडिओ शेअर करुन त्यांच्या लग्नाची घोषणा केली. त्या व्हिडिओमध्ये पायल संग्रामशी लग्न करण्यासाठी खूप रडत होती. कदाचित पायलच्या अश्रूंमुळे संग्रामने तडकाफडकी लग्न करण्याचा निर्णय घेतला.