पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांच्या रिसेप्शनला...

पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांच्या रिसेप्शनला बडे सितारे तसेच हरियाणाचे मुख्यमंत्री व केंद्रीय क्रीडा मंत्री यांची उपस्थिती (Payal Rohatgi-Sangram Singh’s Star-Studded Delhi Reception, Haryana CM Manohar Lal Khattar, Sports Minister Anurag Thakur & Others Attend, See Photos)

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री पायल रोहतगी आणि संग्राम सिंह यांचा आग्रा येथे ९ जुलैला शुभविवाह झाला. काल १४ जुलै रोजी दिल्ली येथे त्यांनी लग्नाची रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. त्यांच्या या रिसेप्शनला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासंह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पाहूया पायल आणि संग्रामच्या रिसेप्शनचे सुंदर फोटो.

लॉकअप शोमधील अभिनेत्री पायल रोहतगी आणि रेसलर संग्राम सिंह यांनी १२ वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर ९ जुलैला लग्न केले. दोहोंच्या संगीत, मेंदी आणि लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर चाहत्यांची प्रचंड प्रमाणात वाहवा मिळवली.

त्यांच्या रिसेप्शनला हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते.

काल १४ जुलैला नवी दिल्ली येथील इंडिया हॅबिटेट सेंटरमध्ये संग्राम आणि पायलने त्यांच्या लग्नाचे रिसेप्सन आयोजित केले होते. त्यांच्या या रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

पायल रोहतगीला पाहून आधुनिक नववधूचे भाव तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते, तर संग्राम सिंगही काळ्या रंगाच्या टक्सिडोमध्ये खूपच देखणा दिसत होता.

पायलने रिसेप्शन पार्टीसाठी सिल्वर रंगाचा गाऊन घातला होता. सोबत तिने घातलेल्या डायमंड चोकर आणि कानातल्यांनी तिचं रुप चांगलंच खुलवलं होतं.

मोकळे केस, भांगेत कुंकु आणि लाल रंगाचा चुडा यात पायल अगदी आधुनिक नववधूसारखीच दिसत होती. तिच्या रिसेप्शनच्या फोटोंना लोकांकडून विशेष पसंती मिळत आहे.

शूटर दादी देखील उभयतांना आशीर्वाद देण्यास उपस्थिती राहिली होती.