अखेर १२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पायल आणि संग्र...

अखेर १२ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर पायल आणि संग्राम विवाहबंधात अडकले (Payal Rohatgi-Sangram Singh Tie The Knot, Actress Stuns In Red Lehenga, See First Pictures)

तब्बल १२ वर्षे एकमेकांना डेट केल्यावर रेसलर संग्राम सिंह आणि अभिनेत्री पायल रोहतगी विवाहबंधनात अडकले आहेत. ऐतिहासिक स्थळ आग्रा ज्याला प्रेमनगरी म्हणून देखील संबोधले जाते अशा ठिकाणी या दोघांनी विवाहगाठ बांधली.

लग्नाचे सर्व विधी जेपी पॅलेसमध्ये झाले. पायलने लग्नासाठी लाल रंगाचा पोषाख परिधान केला होता. त्यावर दागिने आणि साजेसा मेकअप केलेला. नववधूच्या पोषाखात पायल खूप छान दिसत होती. तर संग्रामने सोनेरी रंगाची शेरवानी घातली होती.

दोघांनीही पूर्ण विधीपूर्वक लग्न करून आपल्या बारा वर्षांच्या नात्याला नाव दिले. लॉकअप शो दरम्यान संग्रामने पायलला लग्नासाठी प्रपोज केले होते. पायल कधीच आई होऊ शकत नाही त्यामुळे ती इतकी वर्षे लग्न पुढे ढकलत होती.

पण संग्रामच्या प्रेमापुढे ती काही करु शकली नाही आणि त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. लग्नापूर्वी या जोडप्याने साडेआठशे वर्ष जुन्या मंदिरात महादेवाचे आशीर्वादही घेतले होते.

पायल आणि संग्रामने स्वतः त्यांच्या इन्स्टा अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले आहेत आणि त्याला पायलचा संग्राम असे कॅप्शन दिले आहे.