पायल रोहतगी आणि संग्राम सिंह लग्नाआधी आशीर्वाद ...

पायल रोहतगी आणि संग्राम सिंह लग्नाआधी आशीर्वाद घेण्यास पोहोचले ८५० वर्षं जुन्या मंदिरात, लवकरच विवाहबंधनात अडकणार (Payal Rohatgi And Sangram Singh To Get Married In The 850-Year-Old Temple In Agra On July 9)

गेली १२ वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेत्री पायल रोहतगी आणि रेसलर संग्राम सिंह (Sangram Singh and Payal Rohatgi) अखेर ९ जुलैला विवाहबंधनात अडकणार आहेत. त्यांच्या वेडिंग डेस्टिनेशनबद्दल रोहितने आधीच सांगितले होते की, त्यांचे लग्न राजस्थान किंवा मुंबईतील कोणत्याही मंदिरात होईल. पण आता त्यांनी लग्नाचे ठिकाण बदलले असून ते आग्रा येथे लग्न करणार आहेत. आग्रा येथील  जे पी पॅलेसमध्ये लग्नाचे इतर विधी होतील. आता सोशल मीडियावर रोहित व पायलच्या मेंहदी, हळद आणि संगीताचे फोटो व्हायरल होत आहेत.

लग्नापूर्वी या दोघांनी आग्रामधील प्राचीन राजेश्वर महादेव मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले. हे मंदिर ८५० वर्षे जुने आहे. या मंदिरात पायल आणि रोहितने शंकर पार्वतीचे दर्शन घेऊन त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली. असे म्हणतात की, या मंदिरात एखादी गोष्ट मनापासून मागितली तर ती नक्की पूर्ण होते.

काही दिवसांपूर्वी रोहित आणि पायलने त्यांच्या प्री वेडिंग शूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोत दोघांचा रोमॅण्टिक अंदाज पाहायला मिळला. त्या फोटोला रोहितने कॅप्शन देत म्हटलेले की, आमच्या आयुष्याची नवी सुंदर सुरुवात, तु्मच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज आहे.

फोटोत पायलने मरुन रंगाचा लेहंगा घातला आहे तर रोहितने सोनेरी रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचा पायजमा घातला आहे. दोघेही खूप सुंदर दिसत आहेत.

खरेतर रोहितला २१जुलै म्हणजेच त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी लग्न करायचे होते मात्र ते काही कारणास्तव शक्य नसल्यामुळे ते ९ जुलैला लग्न करत आहेत. लग्नानंतर १४ जुलैला दिल्लीला रिसेप्शन असणार आहे.