‘पवित्र रिश्ता’ गर्ल अंकिता लोखंडेचा यलो ...

‘पवित्र रिश्ता’ गर्ल अंकिता लोखंडेचा यलो हॉल्टर नेक गाउनमधील कमालीचा लूक! (Pavitra Rista Girl Ankita Lokhande Wears Yellow Halter Neck Gown, Fans Says ‘look kamaal Hai, Madam!’)

पवित्र रिश्ता गर्ल अंकिता लोखंडेने हल्लीच आपले काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे, ज्यात तिने बॅकलेस हॉल्टर नेक गाउन घातला आहे. फोटोंमधील तिच्या घायाळ करणाऱ्या अदा पाहून चाहते आनंदाने सद्‌गदीत होत आहेत. अंकिताने इंटरनेटवर आपले फोटो पोस्ट केल्यानंतर, ते काही क्षणात व्हायरल झाले आहेत.

छोट्या पडद्यावरील ‘पवित्र रिश्ता’ या लोकप्रिय मालिकेमुळे अभिनेत्री अंकिता लोखंडे घराघरांत पोहोचली आहे. आपल्या दर्शकांसाठी ती सोशल मीडियावर आपले फोटो तसेच व्हिडिओ देखील शेअर करत असते. तिच्या डान्सच्या व्हिडिओज्‌नाही चाहत्यांकडून अगदी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतो.

अलीकडेच तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही हॉट आणि सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये अंकिताने पिवळ्या रंगाचा बॅकलेस गाउन घातलेला आहे. या गाउनमध्ये अंकिता अतिशय कुल दिसत असून तिच्या या लूकमुळे तिचे चाहते इन्स्पायर्ड होत आहेत. आपल्या या फोटोंना कॅप्शन देताना अंकिता लिहिते की- ”पुढे काय आहे?” हा प्रश्न नेहमीच बदल घडवून आणतो, तो चांगला असो वा वाईट.

आपल्या या पिवळ्या रंगाच्या नेकलेस गाउनमध्ये अंकिता आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करताना दिसत आहे. बॅकलेस ड्रेसमुळे फोटोंमध्ये अंकिताची तजेलदार त्वचा अधिकच चमकत आहे. तिचा ब्राइट यलो रंगाचा हॉल्टर नेक गाउन वातावरणातील तपमान वाढवतोय्‌ एवढं नक्की.

नो मेकअप…!

आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिने या फोटोसाठी अजिबात मेकअप केलेला नाही. मेकअपशिवायही अंकिता या हॉल्टर नेकच्या गाउनमध्ये अप्रतिम दिसत आहे. तुम्हाला खरं वाटणार नाही पण आपल्या बहुतांशी व्हिडिओ आणि फोटोंमध्ये अंकिता मेकअपशिवायच असते.

स्माइल प्लीज…

अंकिताचं स्माइल अतिशय गोड असल्यामुळे तिचं हास्य तिच्या चेहऱ्याची सुंदरता अधिक वाढवतं. या फोटोंमधेही ती अतिशय आनंदी दिसत आहे. तिचे प्रशंसक तिच्या फोटोंची स्तुती करताना सोशल मीडियावर आपले कमेंट्‌स टाकत आहेत. एका प्रशंसकाने पिवळ्या रंगाची ही शेड तिच्यासाठी अतिशय चमत्कारिक असल्याचे लिहिले आहे. तर दुसऱ्या प्रशंसकाने, मेकअपशिवाय नैसर्गिक केशरचनेमध्ये ती किती सुंदर वाटत आहे, असे लिहिले आहे.

तिच्या या फोटोंच्या पोस्टसाठी ”लूक कमाल है, अमेझिंग मॅम”, ”तेरी ऐसी अदा पे तो फिदा हम है” अशाप्रकारच्या कमेंट्‌सही तिच्या प्रशंसकांनी लिहिलेल्या आहेत. एका प्रशंसकाने तर, आता सुशांत तुला पाहू शकला असता तर…! अशीही कमेंट लिहिली आहे. अंकिता ही उत्तम अभिनेत्री आहे आणि तिला हे अभिनयाचं क्षेत्रंही खूप आवडतं. तिच्या आगामी प्रोजेक्टबद्ल सांगायचं तर अंकिता लवकरच ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या दुसऱ्या भागामध्ये दिसणार आहे. या मालिकेच्या पहिल्या भागापासूनच अंकिताच्या अभिनयाची सुरूवात झाली आहे. त्यात तिने अर्चनाची मध्यवर्ती भूमिका साकारली होती. आणि आता याच मालिकेच्या दुसऱ्या भागातही ती आपल्या दर्शकांच्या मनावर राज्य करणार यात काही शंका नाही.