पवित्र रिश्ता फेम करिश्मा शर्माची गरोदरपणामुळे ...

पवित्र रिश्ता फेम करिश्मा शर्माची गरोदरपणामुळे हालत खराब,चाहत्यांना बसला आश्चर्याचा धक्का, म्हणाले हे कधी झालं(Pavitra Rishta Fame Karishma Sharma’s Latest Pictures Goes Viral As She Was Seen Crying Badly In Pregnancy, Fans React)

सुंदर, बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री करिश्मा शर्माने पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेत अर्चनाच्या  म्हणजेच अंकिता लोखंडेच्या नातीची भूमिका साकारली, त्यामुऴे तिला खूप लोकप्रियता मिळाली. करिश्मा केवळ बोल्डनेस सोबतच तिच्या अभिनय कौशल्यासाठीही ओळखली जाते. ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे.

मात्र करिश्माचे अलीकडेच काही फोटों पाहून चाहत्यांना आश्चर्यचा धक्का बसला. या फोटोंमध्ये ती गरोदर दिसत असून तिची प्रकृती खूपच वाईट असल्यासारखे भासत होते. ती खूप अडचणीत दिसत होती. मळलेले कपडे, गरोदरपण आणि अस्वस्थपणा या गोष्टी फोटोत स्पष्ट दिसत होत्या. सुरुवातीला तर तिला ओळखणेही कठिण झाले होते. पण नंतर या फोटोची दुसरी बाजू जगासमोर आली.

करिश्माने स्वतः कॅप्शनमध्ये या फोटोंचे सत्य सांगितले आहे. हा तिच्या चित्रपटाच्या ऑडिशनसाठीचा गेटअप आहे. एका चित्रपटात बांगलादेशी महिलेच्या भूमिकेसाठी तिने ऑडिशन दिली आणि तिला ही भूमिका मिळाली. करिश्माने सांगितले की, गेल्या वर्षी मी गर्भवती असलेल्या बांगलादेशी महिलेच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिली होती आणि या संधीसाठी तिने देवाचे आभार मानले होते.

यासोबतच करिश्माने चाहत्यांना तिच्या या लूकबद्दल विचारले आहे.

चाहते तिची स्तुती करत आहेत, तर काही जण तिला ट्रोल करत आज हिचा खरा चेहरा समोर आला असे म्हणत आहेत. तर काहीजण हा आहे तुझा नो फिल्टर आणि विना मेकअपचा खरा लूक. करिश्माबद्दल बोलायचे झाले तर पवित्र रिश्ता व्यतिरिक्त ती प्यार का पंचनामा 2 आणि उजडा चमन मध्ये देखील दिसली आहे.