कारमधून उतरताना अंकिता लोखंडेसोबत घडली लाजिरवाण...

कारमधून उतरताना अंकिता लोखंडेसोबत घडली लाजिरवाणी घटना, डीप नेक ड्रेसमुळे युजर्सनी केले ट्रोल (Pavitra Rishta Actress Ankita Lokhande Faces Oops Moments While Stepping Out Of Her Car)

पवित्र रिश्ता फेम अभिनेत्री अंकिता लोखंडे काही दिवसांपूर्वीच उप्स मोमेंटची शिकार झाली. तिचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तसेच तिने घातलेल्या डीप नेकच्या ड्रेसवरुन युजर्स तिला जोरदार ट्रोल करत आहेत.

अभिनेत्री अंकिता लोखंडे आपला पती विकी जैनसोबत एका कार्यक्रमाला गेली होती. त्यावेळी तिने निळ्या रंगाचा डीप नेक असलेला शिमरी गाउन घातला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचल्यावर कारमधून उतरत असताना अंकिता उप्स मोमेंटची शिकार झाली आणि नेमका तोच क्षण मीडियाने कॅमेऱ्यात कैद केला.

तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  त्या कपड्यांमध्ये तिला कम्फर्टेबल वाटत नसल्याचे सरळ दिसून येते. त्यामुळे व्हिडिओ पाहून ट्रोलर्सनी सुद्धा तोंडसुख घेत ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एका युजरने लिहिले की, कपडे सावरता येत नसतील तर तसे कपडे घालायचे कशाला, तर आणखी एका युजरने कमेंट करत म्हटले की कधी तरी नीट कपडे घालत जा. एकाने ही असे कपडे घालते म्हणजे संस्कार विसरलीस का असे विचारले, दुसऱ्या युजरने आता राखी सांवत पण असे कपडे घालत नाही तर ही घालायला लागली असे म्हणत कमेंट केली.

अंकिता लोखंडेने पेशाने व्यावसायिक असलेल्या विकी जैनसोबत डिसेंबर 2021 मध्ये लग्न केले. काही दिवसांपूर्वी अंकिता आणि विकी हे दोघे स्मार्ट जोडी या रिअॅलिटी शो ची विजेती जोडी ठरले होती.