पवित्रा पुनियाचा लाल रंगात मादक देसी लूक(Pavitr...

पवित्रा पुनियाचा लाल रंगात मादक देसी लूक(Pavitra Punia All Set To Raise The Fashion Quotient In Hot Red Indian Outfits, Actress Winning Fans With Her Strong Glam Game, See Stunning Pictures)

पवित्रा पुनिया तिच्या हॉट लूक आणि परफेक्ट फिगरसाठी ओळखली जाते. सध्या अभिनेत्रीला देसी लूकची नशा चढली आहे. पवित्रा सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते आणि चाहत्यांसोबत स्वत:चे सुंदर फोटो शेअर करत असते.

पवित्राने याआधीही देसी लूकमध्ये बरेच फोटोशूट केले आहे. तिच्या सर्व चाहत्यांना ते खूप आवडले.

अलीकडेच पवित्राने लाल साडीत आपले भारतीयपण दाखवले आणि सोबतच आपल्या हॉट फिगरचे प्रदर्शन केले. या फोटोंमध्ये तिचे कमावलेले शरीर स्पष्टपणे दिसत आहे. पवित्राने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- माय इंडियन नेस म्हणजे माझे भारतीयत्व.

पवित्राने अतिशय आधुनिक शैलीत साडी नेसवली आहे. तिचा सेक्सी स्लीव्हलेस ब्लाउज तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. अभिनेत्रीने तिच्या ऍब्सवरील तीळ आणि सडपातळ कंबरेला रत्नजडित कमर बेल्टने सुशोभित केलेले पाहायला मिळते.

वेव्ही हेअरस्टाईल, स्मोकी कॅट आय लुक आणि ओठांवर गुलाबी रंग यामध्ये पवित्रा खरोखरच सुंदर आणि मादक दिसत आहे.

चाहते तिच्या प्रत्येक पोजवर फायर आणि हृदयाचे इमोजी कमेंट करत आहेत. कोणी तिला गुलाबाचं फूल म्हणतंय, तर कोणाची नजर तिच्या ऍब्सवरच्या तीळावर खिळली आहे.

यानंतर पवित्राने लाल लेहेंगा आणि चोळीमध्ये फोटो पोस्ट केले. यामध्ये तिचे केस सरळ आहेत. तिच्या हातात भरपूर लाल बांगड्या, कपाळावर बिंदी, ओठांवर लाल लिप्सिक आणि डोळ्यात काजळ असा लूक पाहायला मिळत आहे.

अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे – रंगरेज.. चाहत्यांना तिचे हे फोटो खूप आवडले असून कमेंटमध्ये- उफ ही मुलगी! तर काही जण – हा रंग तुम्हाला सर्वात जास्त शोभतो असे म्हणाले आहेत.