अनंत अंबानीच्या साखरपुड्याला जीन्स-टीशर्ट घालून...

अनंत अंबानीच्या साखरपुड्याला जीन्स-टीशर्ट घालून गेला जॉन अब्राहम, याला ड्रेस कोड दिला नाही असे म्हणत युजर्सने केले ट्रोल(Pathaan Actor John Abraham Gets Trolled For Wearing Casual Clothes At Anant Ambani’s Engagement, Netizens Says, ‘Isko Dress Code Nai Dia Lagta…’)

काल अंबानी कुटुंबात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. बिझनेसमन मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याचा काल साखरपुडा पार पडला. अनंत अंबानीच्या साखरपुड्याला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. अशातच पठाण फेम अभिनेता जॉन अब्राहमनेही अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याच्या पार्टीला हजेरी लावली होती. पण अंबानी कुटुंबाच्या या ग्रँड फंक्शनमध्ये जॉन अब्राहम त्याच्या कॅज्युअल लूकमुळे चांगलाच ट्रोल झाला.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा साखरपुडा काल रात्री अंबानी कुटुंबाच्या अँटिलिया निवासस्थानी पार पडला. अनंत आणि राधिकाच्या एंगेजमेंट पार्टीला राजकारण्यांपासून ते क्रीडा क्षेत्रातील व्यक्ती आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. बॉलिवूड सेलेब्सबद्दल बोलायचे तर, शाहरुख खान, जॉन अब्राहम, जान्हवी आणि खुशी कपूर, अर्जुन कपूर, अनन्या पांडे, दीपिका-रणवीर, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी पार्टीला उपस्थिती लावली.

अंबानी कुटुंबाच्या या शानदार सेलिब्रेशनमध्ये प्रत्येकजण पारंपारिक लूकमध्ये दिसले. पण पार्टीत जॉन अब्राहम अगदी कॅज्युअल लूकमध्ये दिसला. अभिनेता पार्टीमध्ये जीन्स-टी-शर्ट, जॅकेट आणि पांढरे स्नीकर्स घालून आला होता. जॉनच्या या कॅज्युअल लूकमुळे त्याचे चाहते नाराज झाले. सोशल मीडिया युजर्सनी अभिनेत्याला ट्रोल करायला सुरुवात केली.

पापाराझी अकाऊंटने शेअर केलेल्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये एका युजरने कमेंट केली आहे की, तो जबरदस्ती आला असेल. तर आणखी एका युजरने जॉनच्या ड्रेसिंग स्टाइलला अतिशय बेकार म्हटले आहे.

दुसर्‍या सोशल मीडिया वापरकर्त्याने जॉनला कदाचित ड्रेस कोड दिला नसेल असे लिहिले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या साखरपुड्याच्या पार्टीमध्ये जॉनला त्याच्या आउटफिटमुळे ट्रोल केले जात असताना, चाहते अभिनेत्याच्या पठाण चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्याच्या हॉट लूकचे कौतुक करत आहेत.

या चित्रपटात त्याच्यासोबत शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण देखील आहेत, हा चित्रपट 25 जानेवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.