परिणिती चोप्राचा राष्ट्रपतींकडून सन्मान पण, अभि...

परिणिती चोप्राचा राष्ट्रपतींकडून सन्मान पण, अभिनयासाठी नव्हे तर या कारणासाठी (Parineeti Chopra Has Received The President’s Award, Not A Film, But Because Of This It Was Named In The Country Of India)

परिणिती चोप्रा या अभिनेत्रीने आपल्या करिअरमध्ये निवडकच चित्रपट केले असले तरी तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नसताना परिणितीने आपले खास स्थान निर्माण केले आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटातील काम कौतुकास्पद आहे. परिणिती केवळ अभिनयामध्येच हुशार आहे असे नाही, अभ्यासातही ती तितकीच हुशार आहे.


परिणितीने तिच्या शिक्षणातून तिच्या आईवडीलांचे नाव मोठे केले आहे. बारावीत असताना परिणितीने संपूर्ण भारतात अव्वल नंबर मिळवला होता, ज्यासाठी तिला राष्ट्रपतींनी सन्मानित देखील केले होते.


यानंतर परिणीतने लंडनमधील मॅनचेस्टर बिझनेस स्कूलमधून बिझनेस, फायनान्स आणि इकॉनॉमिक्समध्ये ऑनर्सची पदवी घेतली आणि बँकेत नोकरी करण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी आलेल्या मंदीमुळे तिची नोकरी गेली. त्यानंतर ती भारतात परतली आणि अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले.


परिणीती चोप्रा ही ग्लोबल स्टार प्रियांका चोप्राची चुलत बहीण आहे, पण इंडस्ट्रीत नाव कमवण्यासाठी तिने कधीही बहिणीची मदत घेतली नाही. ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ या चित्रपटातून परिणीतीने तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका केली होती. पण या चित्रपटातील तिचे बबली हे पात्र खूप गाजले. त्यानंतर तिला इश्कजादे या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारायची संधी मिळाली. या संधीचे तिने सोने केले.

परिणितीने राणी मुखर्जीसाठी सुद्धा काम केले होते. ती राणी मुखर्जीची असिस्टंट होती, हे खूपच कमी लोकांना माहीत आहे. याबाबतचा खुलासा परिणितीने नेहा धूपियाच्या टॉक शो मध्ये केला होता.
परिणितीचा फॅशन सेन्स तिच्या चाहत्यांना खूप आवडतो. तिला वेगवेगळ्या देशांची भटकंती करण्याची आवड आहे. ती अनेकदा तिच्या सहलींचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.