परिणीती चोप्रा बनली मास्टर स्कूबा डायव्हर; म्हण...

परिणीती चोप्रा बनली मास्टर स्कूबा डायव्हर; म्हणाली, “माझे ९ वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले” (Parineeti Chopra becomes a Master Scuba Diver; says, “My dream of 9 years has finally come true”)

अभिनेत्री परिणीती चोप्रा ही वॉटर बेबी आहे आणि तिचे स्कुबा डायव्हिंगचे प्रेम सर्वांनाच माहीत आहे. छंद म्हणून तिने ते सुरू केले नि आज ते तिची पॅशन बनले आहे. अलीकडेच, परिणीतीने आपल्या यशस्वी कारकिर्दीमध्ये अजून एक मानाचा तुरा रोवलेला आहे. ती “मास्टर स्कूबा डायव्हर”बनली आहे.  सोशल मिडिया हँडलवर परिणीतीने एक व्हिडिओ शेअर करत स्कूबा डायव्हर बनण्याच्या तिच्या प्रवासाची एक झलक आपल्या चाहत्यांना दिली. त्यानंतर चाहत्यांकडून परिणीतीचे अभिनंदन केले जात आहे.

‘मास्टर स्कूबा डायव्हर बनण्याचे माझे ९ वर्षांचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे,’ असे परिणीतीने म्हटले आहे. छंद म्हणून डायव्हिंग सुरू करण्यापासून ते कठोर प्रशिक्षण आणि सरावानंतर मास्टर स्कूबा डायव्हर बनण्यापर्यंतच्या तिच्या प्रवासाबद्दल बोलण्यासाठी तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये स्कूबा डायव्हर म्हणून तिच्या आयुष्यातील विविध क्षण दाखवले आहेत.

व्हिडीओमध्ये ती म्हणते, “आयुष्य तसेच घडते जसे तुम्ही ते घडवता. छंद म्हणून जे सुरू झाले ते लवकरच माझ्या उत्कट आवडींपैकी एक बनले. व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढणे, कठोर प्रशिक्षण, बचाव सत्रे आणि सतत पुढे जात राहणे… अगणित वेळा गटांगळ्या खाणे… मला हे सर्व करायचे होते. आणि आज, नऊ वर्षे आणि शेकडो गटांगळ्यांनंतर, मी शेवटी मास्टर स्कूबा डायव्हरची पदवी मिळवली आहे.”

परिणीतीने व्हिडिओ पोस्टच्या कॅप्शनमध्ये, लिहिलेय, “मी आता एक मास्टर स्कूबा डायव्हर आहे!!!  ही एक पूर्णपणे वास्तविक भावना आहे! माझे ९ वर्षांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे… त्या सर्व वर्षांचे लक्ष्य, बचाव प्रशिक्षण आणि मेहनत फळाला आली आहे!  माझ्यासाठी हा खूप मोठा सन्मान आहे आणि त्यासाठी मी माझ्या प्रवासात ज्यांनी मला प्रशिक्षण दिलं, मला माझं लक्ष्य गाठण्यासाठी  मदत केली त्या @paditv चे मुळीच आभार मानणार नाही! कारण तुम्ही आता माझ्या कुटुंबासारखे आहात.  तसेच, अनीस आणि शमीन अदेनवाला मला जे काही माहीत आहे ते शिकवल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही कायमचे माझे डाइव्ह पालक आहात! @scubanees @shameenadenwala / पुन्हा डायव्हिंग जाण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही.”

परिणीतीच्या कामाबद्दल सांगायचं तर ती शेवटची अमिताभ बच्चन, अनुपम खेर आणि बोमन इराणी स्टारर उंचाई या सिनेमामध्ये दिसली होती.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)