रणबीर आलियाच्या घरी एक नव्हे तर दोन दोन नवे पाह...

रणबीर आलियाच्या घरी एक नव्हे तर दोन दोन नवे पाहुणे येणार, प्रसिद्ध ज्योतिषाने केली होती भविष्यवाणी (Parents-to-be Alia Bhatt And Ranbir Kapoor are expecting twins, Earlier Astrologers have predicted the same)

अभिनेत्री आलिया भट्टने काही दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियावर सांगितली. तिच्या या गोड बातमीमुळे तिच्या कुटुंबियांसोबतच तिचे चाहतेही खूप खुश आहेत. आलिया आणि रणबीर लवकरच आईबाबा होण्यासाठी उत्सुक आहेत. रणबीर सध्या तो बाबा होणार असल्यामुळे खुश आहे. शमशेरा  चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तो वेगवेगळ्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे.  काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत रणबीरने सांगितले होते की, तो आणि आलिया नेहमी मुलांबद्दल बोलायचे. दोघांनाही आयुष्यात खूप मुलं हवी आहेत आणि त्यांची ही इच्छा पूर्ण होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार रणबीर आणि आलियाला जुळी मुलं  होणार असल्याचे बोलले जाते.

आलिया भट्टच्या गरोदरपणाबद्दल नवी बातमी समोर आली आहे. रणबीर- आलियाच्या घरात एक नाही तर दोन दोन  पाहुणे येणार आहेत. या बातमी प्रकरणी कपूर आणि भट्ट कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारचा खुलासा करण्यात आलेला नाही. पण रणबीर आणि आलियाने लवकरात लवकर या बातमीचा खुलासा करावा अशी चाहत्यांची इच्छा आहे.

चाहते दोघांवरही अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत, कमेंटमधून दोघांना शुभेच्छा देत आहेत. दोघे खूप भाग्यवान आहात खूप प्रेम अशा कमेंट चाहते करत आहेत.

काही दिवसांपूर्वी एका प्रसिद्ध ज्योतिषानेही आलिया रणबीरच्या घरात जुळी मुले जन्माला येतील, असे भाकीत केले होते. इतकंच नाही तर त्याची दोन्ही मुलं बॉलिवूडमध्येच करिअर करतील असही त्याने म्हटलं होतं.

मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यात आलियाची प्रसुती होऊ शकते. रणबीर सुद्धा त्याच्या पत्नीला खुश ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. पण रणबीर वडील होण्यासाठी जितका उत्साही आहे, तितकाच तो थोडा घाबरलाही आहे. अलीकडेच, एका मुलाखतीदरम्यान, रणबीरने त्याच्या याच भीतीबद्दल सांगितले ,“मला काय बोलावे ते समजत नाही, कारण हा नवीन प्रवास सुरू होणार आहे. पण मी आनंदी आणि उत्साही आहे आणि थोडा घाबरलो आहे. पण मी देवाचा खूप आभारी आहे आणि देवाने मला ही गोड भेटवस्तू दिली आहे. मी या भूमिकेसाठी पूर्ण तयार असल्याचे तो म्हणाला.