बोनी कपूर रडल्यामुळे जान्हवी कपूरने केले मिली च...

बोनी कपूर रडल्यामुळे जान्हवी कपूरने केले मिली चित्रपटात काम (Papa Boney Kapoor Started Crying, So Janhvi Kapoor Was Ready To Do The Film ‘Mili’, The Actress Revealed)

सध्या जान्हवी कपूर आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘मिली’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तसे, जान्हवी कपूरच्या शानदार आणि दमदार अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत. मात्र बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अपेक्षेप्रमाणे कमाई करू शकला नाही. तीन दिवसांत या चित्रपटाने केवळ 1.3 ते 1.5 कोटींची कमाई केली आहे. जान्हवी कपूर या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असताना तिने हा चित्रपट करण्यास का होकार दिला हे सांगितले होते.

 एका सुप्रसिद्ध वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी कपूरने सांगितले होते की, मी आणखी एका रिमेकमध्ये काम करावे की नाही याबाबत मला प्रश्न पडला होता. जान्हवीने वडील बोनी कपूर यांनाही हेच सांगितले होते. अभिनेत्री म्हणाली, “मी पप्पांना म्हटलं की आपण आणखी एक रिमेक बनवावा असे मला वाटत नाही. मी रुढीप्रमाणे वागायला उत्सुक होते. गुड लक जेरी आणि गुंजन सक्सेना हे दोन्ही भारदस्त चित्रपट होते. मी फक्त मनाने शांत राहणार होते.

तेव्हा माझे वडील बोनी कपूर म्हणाले, “हो बेटा, तू थंड हो. हा चित्रपटपण फ्रीजमधला आहे.” जान्हवीने पुढे सांगितले की, माझे वडील या चित्रपटाबद्दल खूप भावूक झाले होते. ते मला म्हणाले की हा चित्रपट करायला तू जरी नकार दिला तरीही मी तो बनवणार. ते फोनवर रडायला लागले. म्हणाले की, “चित्रपटात बाप आणि मुलीची कथा आहे, ती तुझ्या आणि माझ्यासारखीच आहे.” जान्हवीने असेही सांगितले की ‘मिली’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये अजिबात मजा नव्हती, कारण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान आम्हाला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता.

सस्पेन्स आणि थ्रिलरने भरलेला असा हा ‘मिली’ चित्रपट आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट मल्याळम थ्रिलर ‘हेलेन’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. या चित्रपटात जान्हवी कपूरसोबत सनी कौशलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे.