एअरपोर्टवर अनिता हसनंदानीने घातलेले विचित्र कपड...

एअरपोर्टवर अनिता हसनंदानीने घातलेले विचित्र कपडे पाहून चाहते करवादले म्हणाले, ‘खालचे कपडे विसरलीस काय ग ?’ (‘Pant Bhool Gayi Kya….’ Anita Hassanandani Brutally Trolled For Her Airport Look)

आज सरत्या वर्षाचा अखेरचा दिवस. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बॉलिवूडचे मान्यवर परदेशी निघाले आहेत.
त्यामुळे बॉलिवूड आणि टी.व्ही. स्टार्सना फोटोग्राफर्स, विमानतळावर टिपत आहेत. टी.व्ही. कलाकार अनिता हसनंदानी, आपला नवरा रोहित आणि लहान मुलासह तिकडे आढळली. ती गोव्याला निघाली खरी, पण सर्वांचे लक्ष तिच्या विचित्र कपड्यांवर गेले.

अनिताने निळ्या रंगाचा लांब आणि ढिला ड्रेस घातला होता. तो इतका विचित्र दिसत होता की, चाहते खूपच करवादले. एकजण म्हणाला, हे असले कपडे आणतात तरी कुठून ? दुसरा युजर बोलला, हे तर बाळंतिणीचे कपडे वाटत आहेत. आणखी एकजण म्हणाला, खाली पॅन्ट घालायला विसरलेली दिसते.

आणखी काहीजण बोलले, तुझ्याकडे नव्हती, तर शेजाऱ्याकडून पॅन्ट उधार तरी घ्यायचीस…. अन्य लोकांनी विचारले, हा नाइट ड्रेस आहे की काय? काही लोकांनी अनिताची बाजू घेत टिप्पणी टाकली. त्यात म्हणाले, प्रवासात आरामदायक आणि सुविधाजनक कपडे हवे असतात. त्यावर लोक नकारात्मक टिप्पणी कां करताहेत?

लोकांची निंदा झेलत अनिता गोव्यास पोहचली. तिथे आपल्या सहलीचे काढलेले फोटो तिनं शेअर केलेत. त्यामध्ये रोहित मुलाला घेऊन पाण्यात डुंबताना दिसतो आहे.