अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या पत्नी मृदुला त्रि...

अभिनेता पंकज त्रिपाठी यांच्या पत्नी मृदुला त्रिपाठीचे सिनेसृष्टीत पदार्पण.. (Pankaj Tripathi’s Wife Mridula To Make Bollywood Debut With ‘Sherdil- The Pilibhit Saga’)

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन एक गुड न्यूज शेअर केली आहे. त्यात त्यांनी आपली पत्नी मृदुला त्रिपाठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचे सांगितले आहे. आपल्या आगामी शेरदिल चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान घेतल्या गेलेल्या मुलाखतीमध्ये पंकज त्रिपाठी यांनी याबाबत खुलासा केला आहे.

 मुख्य म्हणजे मृदुला दुसऱ्या कोणाच्या नाही तर पंकज त्रिपाठी यांच्याच आगामी ‘शेरदिल: द पीलीभीत सागा’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणार आहेत. हा चित्रपट श्रीजीत मुखर्जी यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात मृदुला त्रिपाठी यांची महत्वपूर्ण भूमिका असेल, असे त्यांनी सांगितले आहे.

सिनेसृष्टीतील पत्नीच्या पदार्पणाबद्दल पंकज यांनी सांगितले की, ‘’माझ्या पत्नीचे आणि आमच्या दिग्दर्शकांचे बंगाली कनेक्शन आहे. त्यांनी मृदुलाला शेरदिलमध्ये एक भूमिका देण्याचे वचन दिले होते.  या चित्रपटात तिचा एकच सीन आहे. ‘’

पंकज त्रिपाठी यांनी पुढे सांगितले की, ‘’जेव्हा माझ्या पत्नीला या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा तिने क्षणाचा ही विलंब न लावता ‘हो’असे उत्तर दिले. याचे कारण म्हणजे तिला या चित्रपटात सुंदर बंगाली साडी नेसायला मिळणार होती. तसेच तिला या भूमिकेसाठी कोणतीच फी दिलेली नाही. ‘’

पंकज त्रिपाठी यांचा  ‘शेरदिल: द पीलीभीत सागा’ हा चित्रपट २४ जूनला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नीरज काबी आणि सयानी गुप्ता यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय पंकज त्रिपाठी मिर्जापुरच्या तिसऱ्या सीजनमध्ये पाहायला मिळतील. अक्षय कुमारचा ‘OMG 2’ आणि आमिर खानच्या ‘लाल सिंह चड्ढा’  या चित्रपटातसुद्धा त्यांनी  भूमिका केल्या आहेत.