‘आश्रम’ मधील पम्मी म्हणजे अभिनेत्री अदिती पोहनक...

‘आश्रम’ मधील पम्मी म्हणजे अभिनेत्री अदिती पोहनकर आहे एका दिग्गज कुटुंबातील मुलगी..जाणून घ्या कोण आहेत तिच्या कुटुंबातल्या व्यक्ती (Pammi of ‘Ashram’ Comes From A strong Family, You Will Be stunned to Know These Things About Actress Aditi Pohankar)

आश्रम या लोकप्रिय वेब सीरिजचा तिसरा पार्ट लवकरच प्रदर्शित होणार असून त्यानिमित्ताने या सीरिजमधील सर्व कलाकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या सीरिजमधील पम्मी पहलवान हे पात्र अभिनेत्री अदिती पोहनकरने साकारले होते. साध्याभोळ्या दिसणाऱ्या अदितीला ‘आश्रम ३’ या सीरिजमध्ये क्रांतिकारिकेच्या भूमिकेत पाहून सर्वचजण चकित झाले आहे. तर दुसरीकडे ती ‘शी २’ या सीरिजमध्ये बोल्ड आणि बिनधास्त रुपात दिसत आहे. एकाच वेळी दोन विरुद्ध धाटणीच्या भूमिकांमुळे ती चर्चेत आली आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अदिती तिच्या खऱ्या आयुष्यात एका मोठ्या दिग्गज परिवारातील सदस्य आहे. आज आपण तिच्यासंबंधी काही खास गोष्टी जाणून घेऊ.

अदितीने हिंदीसोबतच तमिळ आणि मराठी चित्रपटांमध्ये पण काम केले. पण तिला खरी ओळख रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ या चित्रपटामुळे मिळाली. एखादे पात्र साकारताना अदिती त्या पात्राचा अभ्यास करते आणि मगच त्याचे चित्रीकरण करते.

अदितीचा जन्म मुंबईत एका दिग्गजांच्या कुटुंबात झाला. अभिनयात करियर करण्यापूर्वी एक अॅथलिट अशी अदितीची ओळख होती. अॅथलेटिक्समध्ये तिने महाराष्ट्राचे नेतृत्व करुन १०० आणि २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत अनेक पदके जिंकली आहेत.

अदितीबद्दल फारशी माहित नसलेली गोष्ट म्हणजे ती मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेता मकरंद देशपांडेची मेहुणी आहे. तिने त्यांच्यासोबत अनेक थिएटर शो केले आहेत. याशिवाय अदितीचे वडील सुधील पोहनकर एके काळचे सुप्रसिद्ध मॅरेथॉन अॅथलीट होते तर आई शोभा पोहनकर या राष्ट्रीय पातळीवरील हॉकीपटू होत्या. अदितीची बहिण आणि मकरंद देशपांडे यांची पत्नी निवेदिता पोहनकर या एक स्क्रीनप्ले रायटर आहेत. निवेदिता पृथ्वी थिएटरसाठी नाटक लिहितात. त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ सदस्य म्हणजे अदितीची आजी सुशीलाताई पोहनकर या शास्त्रीय गायिका होत्या. तर काका अजय पोहनकर हे क्लासिकल गायक होते.

अभिनेत्री अदिती पोहनकर सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. अनेकदा ती तिचे बोल्ड आणि हॉट फोटो पोस्ट करुन तिच्या चाहत्यांना घायाळ करते. आश्रम व्यतिरिक्त अदितीने शी या सीरिजमध्ये काम केले होते. त्यात तिने एका कॉन्स्टेबलची भूमिका साकारली होती. शी चा दुसरा सीजन १७ जूनला प्रदर्शित होणार आहे.