उरोभाग आणि उघड्या पायांचे प्रदर्शन करणारी पलक त...

उरोभाग आणि उघड्या पायांचे प्रदर्शन करणारी पलक तिवारीची हिरवाई (Palak Tiwari Flaunts Her Hot Style in Green Printed Dress)

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी दोन मुलांची आई असूनही फिटनेस आणि स्टाईलच्या बाबतीत भल्याभल्या अभिनेत्रींना मागे टाकते यात शंका नाही. मात्र स्टाईलच्या बाबतीत श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी तिच्यापेक्षा दोन पावले पुढे गेली आहे. पलक तिवारी देखील तिच्या आईप्रमाणे ग्लॅमरस आणि खूप सुंदर आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच पलकचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. नुकतेच पलकने २१व्या वर्षात पदार्पण केले असून या खास प्रसंगी तिने तिच्या चाहत्यांसोबत काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात पलक तिवारी हिरव्या प्रिंटेड ड्रेसमध्ये तिचा उरोभाग आणि उघड्या पायांचे प्रदर्शन करत असल्याचे दिसत आहे आणि चाहत्यांची तिच्या फोटोंवरुन नजर हटत नाहीये.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

पलक तिवारीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम हँडलवर तिचे हे नवीन फोटो शेअर केले आहेत. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे फोटो काढले असल्याची कॅप्शन तिने या फोटोंना दिली आहे. या फोटोंत ती हिरव्या प्रिंटेड ड्रेसमध्ये दिसत आहे. तिने केसही मोकळे सोडले आहेत. त्यामुळे तिच्या सुंदरतेत भर पडली असून चाहते तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत आहेत.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

पलकने तिच्या इन्स्टावर दुसरी एक पोस्ट करत, तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती बागेत बसून कॅमेऱ्यासाठी पोझ देत आहे. हिरव्यागार बागेत, हिरव्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये पलकचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. याआधीही पलकने तिचे ग्लॅमरस आणि सुंदर फोटो अनेक वेळा पोस्ट करून प्रसिद्धी मिळवली आहे. पलक सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे आणि ती अनेकदा तिचे हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करते. पलकला इन्स्टाग्रामवर साडेसहा लाखांहून अधिक लोक फॉलो करतात. चाहते अनेकदा पलकच्या फोटोंची आतुरतेने वाट पाहत असतात.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

पलकच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच ‘रोझी – द केसर चॅप्टर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले आहे, तर निर्मिती अभिनेता विवेक ओबेरॉय आणि प्रेरणा व्ही अरोरा यांची आहे. विवेक ओबेरॉय देखील चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहे. यापूर्वी पलक सनी देओलचा मुलगा करणसोबत ‘पल पल दिल के पास’ चित्रपटातून पदार्पण करणार असल्याचे बोलले जात होते.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

उल्लेखनीय म्हणजे, श्वेता तिवारीने २००० साली वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी पलकला जन्म दिला. पलक तिवारी श्वेता आणि तिचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. परंतु, मुलीच्या जन्मानंतर थोड्याच वेळात तिच्या वैवाहिक जीवनात कटुता सुरू झाली आणि तिने राजा चौधरीला घटस्फोट देऊन त्यांचे ९ वर्षांचे नाते संपुष्टात आणले.