पाकिस्तानी नटाची कमाल : ‘गंगुबाई काठियाव...

पाकिस्तानी नटाची कमाल : ‘गंगुबाई काठियावाडी’ पाहण्यासाठी संपूर्ण थिएटर केले बुक (Pakistani Actor Books Entire Theatre To Watch Gangubai Kathiawadi, With His Wife)

संजयलीला भन्साळी यांच्या ‘गंगुबाई काठियावाडी’ ची लोकप्रियता थेट पाकिस्तानात पोहचली आहे. सुरुवातीला आलेल्या अडथळ्यांची शर्यत पार करत हा चित्रपट आता गर्दी खेचतो आहे.

पाकिस्तानचा अभिनेता मुनीब बटने  तर कमालच केली. त्याने आपल्या पत्नीसह हा चित्रपट बघण्यासाठी संपूर्ण सिनेमा थिएटरच बुक केले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम /मुनीब बट
मुनीबची पत्नी एमान खान ही पण पाक अभिनेत्री आहे. अन ती आलिया भट्टची मोठी फॅन आहे. तिने हा चित्रपट पाहण्याची इच्छा प्रदर्शित केली. अन आपल्या पत्नीला सरप्राईझ देण्यासाठी मुनींबने एक थिएटरच दोघांसाठी बुक करुन टाकले.

फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम /मुनीब बट
त्याच्या पत्नीला हे सरप्राईझ खूपच आवडले. दोघांना चित्रपटही खूप आवडला. आलिया भट्टवर काही लोकांनी टीका केली असली तरी सर्वसामान्यपणे तिचे काम लोकांना आवडलेले दिसले. अशा रीतीने आलियाची गंगुबाई प्रेक्षकांना भावली आहे.