पैसा-पैसा गाण्याच्या प्रदर्शनासाठी निया शर्माचे...

पैसा-पैसा गाण्याच्या प्रदर्शनासाठी निया शर्माचे डॉलर्समध्ये स्टायलिश फोटोशूट, म्हणते- जेव्हा पैसा बोलू लागतो, तेव्हा जग शांत होतं… (Paisa Paisa Song: My Money Don’t Jiggle Jiggle… Says Nia Sharma As She Shares Stylish Pictures In Black Dress)

फॅशन क्वीन निया शर्मा अलीकडेच मला काम हवे आहे, असे सांगताना दिसली होती. खूप दिवसांपासून आपण ऑडिशनही दिलेली नाही, असे सांगून तिने सर्वांना धक्काच दिला. तसं पाहिलं तर निया बऱ्याच काळापासून टीव्हीवरून गायब आहे. तेव्हा सर्वांना वाटले होते की नियाने कामातून ब्रेक घेतला आहे. परंतु निया म्हणाली की, ती कामातून कधीच ब्रेक घेऊ शकत नाही आणि तिला सध्या काम आणि पैसे दोहोंची गरज आहे.

निया म्युझिक अल्बममध्ये दिसत असली तरी त्यातून मिळणाऱ्या पैशात तिच्या गरजा भागत नसाव्यात म्हणूनच तिने उघडपणे कामाची मागणी करायला सुरुवात केली असावी.

नुकताच नियाच्या ‘पैसा-पैसा’ या नवीन गाण्याचा टीझर रिलीज झाला आहे, तो तिच्या इन्स्टापेजवर शेअर करत नियाने लिहिलंय – जेव्हा पैसा बोलू लागतो, तेव्हा जग शांत होतं. नियाने तिच्या गाण्याच्या टीझर रिलीजनंतर एक स्टायलिश फोटोशूट देखील शेअर केले आहे, ज्यामध्ये तिचा लूक खरोखरच हॉट आहे.

यामध्ये नियाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे आणि वर जाळी घातली आहे ज्यामुळे तिचा संपूर्ण लुक खूपच ग्लॅमरस दिसत आहे. नियाने ब्लॅक ग्लेअर्स आणि हाय हेअरस्टाइलसह लूक पूर्ण केला आहे आणि तिचे लाल ओठ एकदम सेक्सी दिसत आहेत… नियाच्या बॅकड्रॉपमध्ये अनेक नोट्स म्हणजेच डॉलर्स दिसत आहेत आणि निया उंच टाचांमध्ये अप्रतिम पोझ देत आहे… निया हे प्रमोशन खूप स्टायलिश आहे.

नियाने तिच्या इन्स्टा स्टोरीवर डॉलर्समध्ये पाय हलवले आहेत… आणि फोटो देखील पोस्ट केले आहेत…

नियाला तिच्या या फोटोंसाठी खूप कमेंट्‌स मिळत आहेत. चाहते तिला हॉट चिक, सुपर हॉट वा बेबी डॉल असे म्हणत आहेत. नियाच्या या नव्या लूकची ते प्रशंसा करत आहेत.