६० हजार नेत्रपटल शस्त्रक्रियांचा विक्रम करणारे ...

६० हजार नेत्रपटल शस्त्रक्रियांचा विक्रम करणारे पद्मश्री डॉक्टर (Padmashri Doctor’s Great Achievement : Did 60 Thousand Retina Surgeries)

Padmashri Doctor’s Great Achievement, dr. s natarajan

आतापावेतो ६० हजार नेत्रपटल (रेटिना) शस्त्रक्रिया करून आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे संस्थापक, पद्मश्री प्रा. डॉ. एस. नटराजन यांनी मोठा विक्रम केला आहे. त्यांच्या या हॉस्पिटलचे अग्रवाल आय हॉस्पिटलशी विलीनीकरण करण्यात आले. त्या प्रसंगी ही माहिती मिळाली. अग्रवाल आय हॉस्पिटलचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमर अग्रवाल यांचे हे शंभरावे नेत्र चिकित्सा केंद्र असून त्यापैकी १४ आफ्रिकेत व ८६ भारतात आहेत. या हॉस्पिटल मालिकेत ४०० नेत्र रोगतज्ज्ञ व ४ हजार कर्मचारी आहेत. महाराष्ट्रात १०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून देशभरात ३०० कोटी रुपये गुंतविण्याचा त्यांचा मानस आहे. डॉ. अग्रवाल यांच्या या हॉस्पिटल समुहाने आतापावेतो १२ दशलक्ष पेशटंस्‌ वर इलाज केला आहे.

डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यामध्ये महाराष्ट्रातील डॉ. तात्याराव लहाने यांचा अव्वल क्रमांक आहे. त्यांच्यासोबत आपण काम केले असल्याचे सांगून डॉ. नटराजन आणि डॉ. अग्रवाल यांनी तात्यारावांबद्दल आदरभाव व्यक्त केला. या दोघांच्या एकत्रित येण्याने नेत्ररोग क्षेत्रात डोळ्यांची काळजी, उपचार, संशोधन या विभागात मोठी कामगिरी अपेक्षित आहे.

Padmashri Doctor’s Great Achievement, dr. s natarajan

या निमित्ताने मधुमेह व नेत्रपटल आजार यांचा जवळचा संबंध असल्याचे कळले. त्यामुळे प्रत्येकाने वयाची तिशी ओलांडल्यावर आपली ब्लड शुगर व रेटिना यांची नियमित तपासणी केली पाहिजे, असे डॉ. नटराजन यांनी सांगितले. तसेच मोतीबिंदूची पहिली शस्त्रक्रिया भारतात झाल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.

नेत्रविकार ग्रस्त गरजू रुग्णांना आपण विनामूल्य सेवा देत असल्याचा उल्लेख डॉ. नटराजन व डॉ. अग्रवाल यांनी केला.