आरोग्य आणि तंदुरुस्ती – ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर

ओव्हुलेशन / प्रजनन कॅल्क्युलेटर

महिन्यातील काही दिवस असे असतात जेव्हा स्त्रियांची प्रजननक्षमता खूप चांगल्या स्थितीमध्ये असते आणि ती सहज कंसीव्ह करू शकते. जर त्यांना त्या ठराविक दिवसांबद्दल माहिती मिळाली तर त्यांना कंसीव्ह करण्यात मदत मिळू शकते. ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर हे साधन कोणत्या दिवसात स्त्रीला ओव्हुलेशन होण्याची सर्वाधिक शक्यता असते याचा अंदाज लावते.

ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर म्हणजे काय?
ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर एका महिलेच्या मासिक पाळी दरम्यानच्या विशिष्ट दिवशी तिच्या अंडकोषातून बीजांड बाहेर सोडण्याची किती शक्यता आहे याचा अंदाज लावतो. अर्थात्‌ ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर महिलांच्या सर्वाधिक प्रजनन दिवसांची गणना करते.

ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर कसे काम करतो ?
ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर स्त्रीला शेवटची पाळी कधी सुरू झाली त्याची तारीख आणि स्त्रीला ओव्हुलेशन होण्याची शक्यता किती असते याचा अंदाज घेण्यासाठी दोन मासिक पाळींमधील अंतराची सरासरी घेते. परिणाम प्रदान केलेल्या माहितीवर आणि खालील प्रकाशनाच्या डेटावर आधारित आहेत: सारा जॉन्सन आणि इतर. वर्तमान वैद्यकीय संशोधन आणि मत (2018) DOI:10.1080/03007995.2018.1475348

ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर कसे वापरावे?
आपल्याला आपल्या मासिक पाळीचा कालावधी माहीत असेल तर आपण ओव्हुलेशनचा कालावधी कॅल्क्युलेटरच्या मदतीने सहज शोधू शकतो.

  1. सर्वप्रथम तुम्हाला शेवटच्या पाळीचा पहिला दिवस फिल-अप करायचा आहे.
  2. तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचा महिना किती दिवसांचा असतो हे नमुद करायचे आहे.
  3. सर्व फिल-अप केल्यावर ‘कॅल्क्युलेट’ वर क्लिक करायचं.

परिणाम कसा प्रदर्शित केला जाईल आणि त्याचा अर्थ काय असेल?

एकदा माहिती भरल्यानंतर कॅल्क्युलेट वर क्लिक केलं की एक कॅलेंडर दिसेल ज्यावर टक्केवारीसह ओव्हुलेशनचे दिवस चिन्हांकित करून दर्शविले जातील. तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारावर त्या दिवशी ओव्हुलेशनची ही टक्केवारी शक्य आहे, असे समजावे.

मी ओव्हुलेशन कॅल्क्युलेटरवर अवलंबून राहू शकते का?

मूलतः कॅलेंडर पद्धत घेऊन ओव्हुलेशन कॅल्क्युलेट करताना दोन मासिक पाळींमधील अंतर आणि शेवटच्या कालावधीची तारीख यावरून संभाव्य ओव्हुलेशन दिवसांचा अंदाज लावता येतो. ही पद्धत केवळ माहितीच्या उद्देशाने वापरली जावी.
प्रजननासाठी अधिक सुयोग्य व अचूक कालावधी समजण्यासाठी वैयक्तिक ओव्हुलेशन चाचण्या करून प्रजनन हार्मोन्स शोधणे ही अधिक अचूक पद्धत आहे.
ओव्हुलेशन चाचण्या कॅलेंडर पद्धतीपेक्षा २ पट अधिक अचूक असतात [१].

ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर फर्टिलिटी कॅलेंडरपेक्षा वेगळे कसे आहे?

  • ओव्हुलेशन कॅल्क्युलेटर विशिष्ट दिवशी ओव्हुलेशन होण्याच्या संभाव्यतेचा अंदाज लावतो.
  • फर्टिलिटी कॅलेंडर असे दिवस दर्शवते जेव्हा सेक्समुळे गर्भधारणा होण्याची शक्यता असते.
Ovulation Calculator
When did your last period start?
E.g. 18/01/2020
Usually, how long is your cycle?
Cycles typically vary from 23 to 35 days
Estimate your ovulation day
likelihood of ovulating today
Due to your cycle length, unfortunately we can't estimate an ovulation probability. We recommend that you use a Digital Ovulation Test to accurately detect your most fertile days.
  *
Start of your last period
  20%
Likelihood of ovulating on this date
Change my informations
In partnership with Clearblue®.
Results are based on the information you have provided and data from the publication below: Sarah Johnson, Lorrae Marriott & Michael Zinaman (2018): “Can apps and calendar methods predict ovulation with accuracy?”, Current Medical Research and Opinion, DOI:10.1080/03007995.2018.1475348