आलिया भट्टकडे आहे गुड न्यूज … हॉस्पिटलातून तिने...

आलिया भट्टकडे आहे गुड न्यूज … हॉस्पिटलातून तिने स्वतःच उघड केले गुपित (‘Our Baby… Coming Soon’, Alia Bhatt Announces Pregnancy, Shares Adorable Picture From Hospital)

आजची सकाळ आलिया-रणबीरच्या चाहत्यांसाठी एक गोड बातमी घेऊन आली आहे. हे दोघे होणार आहेत आई-बाबा! आलियाने स्वतःहून हॉस्पिटलच्या बेडवरून जाहीर केली ही बातमी!

आलियाने हॉस्पिटलातून अल्ट्रासाऊंड सोनोग्राफीचे छायाचित्र प्रसारित केले आहे. स्क्रीनवर तिने एक इमोजी शेअर करून लिहिलंय्‌…

‘आमचं बाळ लवकरच येणार आहे….’ आलियाच्या बाजूला रणबीर कपूर बसलेला दिसतोय्‌. आलिया बेडवर झोपली आहे. दोघेही सोनोग्राफी मशीनचा मॉनिटर बघत आहेत.

यानंतरच्या फोटोत सिंह, सिंहीण आणि त्यांचा छावा यांचा फोटो प्रसारित केला आहे. जणू छोट्या कुटुंबाचे प्रतीक तिने दाखवले आहे.

नवलाची गोष्ट म्हणजे लग्न झाल्यावर फक्त अडीच महिन्यात आलियाची गूड न्यूज आली आहे. त्यामुळे चाहते चकित झालेत व आनंदीत पण झालेत. आलियाचे चाहते, तिची नणंद आणि काही मान्यवर तिचे अभिनंदन करू लागले आहेत.