या अभिनेत्रींना ओशाळलेल्या स्थितीला सामोरे जावे...

या अभिनेत्रींना ओशाळलेल्या स्थितीला सामोरे जावे लागलेले क्षण… (Oops Moments Of Bollywood Actresses)

फिल्मी जगतातील मोठ-मोठ्या अभिनेत्रींचे ड्रेसिंग, फॅशन, स्टाइल बघून त्यांचे चाहते त्यांच्यासारखी स्टाइल करायला जातात. परंतु कधी कधी या अभिनेत्रींनाही आपल्या फॅशनमुळे काही लज्जास्पद क्षणांना सामोरे जावे लागते. अशाच काही अभिनेत्रींचे ड्रेसमुळे फजिती झालेले क्षण –
आलिया भट्टचा हा ड्रेस इतका पारदर्शी होता की या ड्रेसमधून सर्व आरपार दिसत होतं. एका कार्यक्रमातील तिचा हा फोटो आहे.

परिणीती चोप्रा तर नेहमीच अशाप्रकारच्या क्षणांमुळे ट्रोल होते. अलीकडेच तिने ब्रा न घालता एक ड्रेस घातला होता, ज्यामुळे नंतर तिला ट्रोल केले गेले.

याआधी देखील परिणीती अशीच ट्रोल झाली होती. तेव्हा तिला आपला ड्रेस फाटला आहे हे माहीतच नव्हते आणि ती तशीच सगळीकडे फिरत होती.

एक ड्रेस तर इतका पारदर्शक होता की त्यातून सर्व दिसत होतं.
तसं पाहिलं तर प्रियंका चोप्रा बरेचदा आपल्या ड्रेसमुळे ट्रोल होत असते परंतु, एकदा निकसोबत असताना तिने घातलेल्या पारदर्शी ड्रेसमुळे तिला अतिशय लाजिरवाण्या स्थितीला सामोरं जावं लागलं होतं. आपल्या हातातील बॅगने ती स्वतःचा बचाव करताना दिसत होती. त्यावेळेस लोकांनी तर तिच्याकडून इतर अभिनेत्रींनी हँडबॅगचा वापर कसा करावा याची प्रेरणा घ्यावी, असंही म्हटलं होतं.

सोनम कपूर अतिशय स्टायलिश आहे आणि तिला अतिशय चांगला फॅशन सेन्स आहे असंही म्हणतात. परंतु एका समारंभात ती आपल्या रिवीलिंग कपड्यांमुळे इतकी अनकंफर्टेबल झाली होती की पूर्ण वेळ ती स्वतःचे कपडेच सांभाळताना दिसत होती.

करीना नेहमी एकदम परफेक्ट असते परंतु एका समारंभाच्या वेळेस तिच्या ब्लाउजने तिचा घात केला आणि मग तिला ते फिक्स करावं लागलं.

दीपिकाही एकदा गोल्डन ड्रेसमध्ये ट्रोल झाली होती. अतिशय रिवीलिंग अशा त्या ड्रेसमध्ये ती स्वतःही ओशाळल्यासारखी दिसत होती.

ऐश्वर्या राय नेहमी सभ्य कपड्यांमध्येच दिसते. तरीही एकदा तिच्या ड्रेसने तिला ट्रोलर्सची शिकार बनवले. तो ड्रेस इतका लहान होता की कारमध्ये बसताना तो खूपच वर चढला होता. त्यावेळेस फोटो काढणाऱ्या फोटोग्राफर्सवर अभिषेक चिडला होता.

कतरीना कैफ दिसायला सुंदर आहेच परंतु कधी कधी उत्साहाच्या भरात तिला आपल्या कपड्यांचेही भान राहत नाही.

कंगना बॉलिवुडची क्वीन आहे. पण तिची प्रत्येक स्टाइल ट्रोल होते. एकदा तर तिने असा विचित्र ड्रेस घातला होता की जे दिसायला नको होतं तेही त्या ड्रेसमुळे दिसलं.

परफेक्टन्सिट जॅकलिनलाही एका समारंभाच्या वेळेस ओशाळल्यासारखं झालं होतं. समारंभात आपल्या बुटाची लेस बांधताना तिची छाती एवढी दिसत होती की तिने आपली बसण्याची पोज आणि गुडघ्यांनी ते लपविण्याचा प्रयत्न केला होता.

आपण ज्या क्षेत्रात काम करतो तेथील ग्लॅमरस जगाचा हा भागच आहे अशा आत्मविश्वासानेच अनुष्का शर्मा अशा लाजिरवाण्या क्षणांना सामोरी जाते.