तोकडा लाल ड्रेस घातल्याने अनन्या पांडेची कुचंबण...

तोकडा लाल ड्रेस घातल्याने अनन्या पांडेची कुचंबणा : सावरताना झाली पुरेवाट (Oops Moment: Internet Trolls Ananya Panday For Wearing Short Dress As She Gets Uncomfortable In Mini Red Outfit)

काही दिवसांपासून गहराइयां या चित्रपटाची सर्वत्र चर्चा आहे. सिद्धांत चतुर्वेदी आणि दीपिका पादुकोण यांच्यासोबतच अनन्या पांडे देखील या चित्रपटात आहे. दीपिकाने या चित्रपटामध्ये दिलेल्या बोल्ड सीन्समुळेच कदाचित प्रदर्शनापूर्वीच चित्रपट एवढा चर्चेत आहे. आता या चित्रपटाचं प्रमोशन सुरू झालंय.

सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनन्या पांडेने हॉट लाल रंगाचा ड्रेस घातला होता. परंतु तो ड्रेस इतका तोकडा होता की त्यामुळे तिची कुचंबणा झाली होती. ड्रेस सावरताना तिची पुरेवाट झाली होती. सारखी सारखी ती तो ॲडजेस्ट करताना दिसत होती. पायऱ्या उतरणेच नाही तर सरळ चालणेही तिला अवघड झाले होते.

अनन्याची ही परिस्थिती पाहिल्यानंतर युजर्स तिला ट्रोल करत आहेत. स्ट्रगल क्विनचे कपडे देखील स्ट्रगल करत आहेत का? असे प्रश्न तिला विचारले जात आहेत. ज्या कपड्यांमध्ये चालताही येऊ नये, इतके तोकडे कपडे घालायचेच कशाला? असंही चाहते म्हणताहेत.

हे अनन्याच्या बाबतीत पहिल्यांदाच झालं नसून याआधीही ती तिच्या कपड्यांमुळे ट्रोल झाली आहे. त्यावेळेस छोटासा ब्रालेट टॉप ट्राऊजरसोबत तिने घातला होता आणि मीडियासमोर पोझ देतेवेळी ती थंडीने कापू लागली. तेव्हा सिद्धांतने स्वतःचं जॅकेट तिला घातलं. त्यानंतर दोघांनी पोझ दिल्या. फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम / विरल भयानी