कान्स महोत्सवात, रेड कार्पेटवर धडपडली दीपिका पा...

कान्स महोत्सवात, रेड कार्पेटवर धडपडली दीपिका पादुकोण ; तिच्याच लांबलचक स्टायलिश ऑरेंज गाऊनमध्ये पाय अडकला (Oops Moment: Deepika Padukone Struggles To Walk And Climb Stairs On Cannes Red Carpet In Her Stylish Orange Gown)

या वर्षीच्या कान्स या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दीपिका पादुकोण ज्युरी सदस्य आहे, हे अभिमानास्पद आहे. पण या महोत्सवात जाताना रेड कार्पेटवर अशी काही धडपडली की तिची फजिती झाली. लांबलचक स्टायलिश ऑरेंज गाऊन तिनं घातला होता. त्याच्यात पाय अडकून दीपिका गडबडली…

या ड्रेसमध्ये कॅमेरासमोर पोझेस्‌ देताना आपल्यात काहीतरी उणीव असल्याचे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. अन्‌ तिचा सगळा वेळ खाली बघत बघत आपला ड्रेस सांभाळण्यात गेला. त्यात आणखी फजिती म्हणजे दीपिकाला चालणे कठीण होऊन बसले. म्हणून तिने या ड्रेसचा घोळ स्वतःच हातात पकडला आणि पायऱ्या चढली…

हा प्रकार पाहून फॅन्सनी तिला चांगलेच कोंडीत पकडले. सावरता येत नाही तर घालायचाच कशाला असा ड्रेस; सोयीचा ड्रेस घालायला हवा होता, अशा कमेंट्‌स त्यांनी दिल्या. ब्रुट इंडियाने दीपिकाचा हा गोंधळलेल्या अवस्थेतला व्हिडिओ ट्वीटर वर प्रसिद्ध केला. त्यात चेहऱ्यावर कानकोंडे झाल्याचे भाव स्पष्ट दिसत आहेत.

ही फजिती सोडा, पण दीपिकाने आपल्या इन्स्टाग्रामवर या अतिशय स्टायलिस्ट गाऊनचे फोटो प्रकाशित केले आहेत. त्यात ती खूपच ग्लॅमरस्‌ दिसते आहे. त्यावर चाहत्यांनी स्टायलिश, बेस्ट, देवता, असे चांगले शेरे प्रसिद्ध केले आहेत.

(फोटो / व्हिडिओ सौजन्य – इन्स्टाग्राम / ट्वीटर)