ऊप्स मोमेंट : मौनी रॉयला ड्रेसने उघडे पाडले, फज...

ऊप्स मोमेंट : मौनी रॉयला ड्रेसने उघडे पाडले, फजिती टाळण्यासाठी ती रस्त्यावर धावत सुटली (Oops Moment: Actress Mouni Roy’s Wardrobe Malfunction Caught On Camera)

मौनी रॉय अनेकदा तिच्या हॉट लूक आणि बिकिनीतील फोटोंमुळे चाहत्यांचे होश उडवताना दिसते. परंतु आता तिच्यासोबत जे काही घडलं आहे त्यामुळे तिचे स्वतःचे होश उडाले आहेत. नागिन फेम अभिनेत्री मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती पारंपारिक कपड्यांप्रमाणेच सेक्सी कपड्यांमध्येही सुंदर दिसते. पण यावेळी मौनीच्या ड्रेस सिलेक्शनने तिला फसवल्यासारखे वाटते. मौनीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यात ती ऊप्स मोमेंटची शिकार झाली आहे.

Oops Moment, Mouni Roy

मौनीला हॉल्टर नेकच्या बॅकलेस फ्लोरल गाऊनमध्ये स्पॉट करण्यात आले होते. या ड्रेससोबत तिने स्पोर्ट्स शूज घातले होते. दरम्यान, मौनी पॅपराझीसाठी पोज देण्यास थांबलीही होती, परंतु या संपूर्ण फोटो सत्रादरम्यान ती तिचा गाऊन हाताने सांभाळताना दिसली. मौनीचा हा गाऊन इतका डीप होता की एका बाजूने ओघळत असल्याने तिला हाताने वर करावा लागत होता. त्यामुळे ती खूप अस्वस्थ दिसत होती. तिचा अस्वस्थपणा फोटोग्राफर्सच्याही लक्षात येत होता. त्यामुळे सगळ्यांसमोर आपली फजिती होण्याआधी तेथून निसटण्याची संधी पाहून मौनी रस्त्यावर धावत सुटली आणि घाईघाईने तिच्या कारमध्ये बसू लागली, पण एवढ्या घाईतही मीडियाच्या कॅमेऱ्याने तिचा ऊप्सवाला क्षण अखेर टिपलाच.

Oops Moment, Mouni Roy

मौनीचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांना थट्टेचा विषयच मिळाला. त्यांनी तिला चांगलेच निंदावले आहे. सांभाळता येत नाहीत असे कपडे घालायचेच कशाला? असं एकाने लिहिलंय तर दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलंय की – एका बाजूला केसांनी लपवले, दुसरीकडे हाताने, तेव्हा असे अस्वस्थ करणारे कपडे तुम्ही का घालता?

Oops Moment, Mouni Roy

एकाने आपल्या कमेंटमध्ये म्हटलंय, ‘धड दाखवताही येत नाही, अन्‌ लपवताही येत नाही…’  मौनी स्वतःला करीना समजते काय… या मुलीने कितीही एक्सपोज केलं तरी तिला मुख्य भूमिका मिळणार नाहीत… अशा प्रतिक्रियांसोबतच मौनीनं देशाची संस्कृती बिघडवली आहे असंही काहींना वाटतंय. थोडक्यात काय तर सगळ्यांनाच वाटतंय की मौनीनं तिला सांभाळता येत नाही असा ड्रेस घालायला नको होता इतकंच.

Oops Moment, Mouni Roy

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम/बॉलिवूड पॅप