‘पुष्पा’चे गाजलेले गाणे ‘ओ अं...

‘पुष्पा’चे गाजलेले गाणे ‘ओ अंतावा…’ आता मराठीत (‘Oo Antava’ The Famous Song From ‘Pushpa’ Now In Marathi)

‘पुष्पा’ या सुपरहिट चित्रपटातील ‘ओ अंतावा’ हे गाजलेले गाणे आता मराठीत सादर करण्यात आलं आहे. गायिका रागिणी कवठेकरने सादर केलेल्या या गाण्याच्या मराठी आवृत्तीला मूळ गाण्याइतकीच प्रसिद्धी मिळत आहे.

विविध पार्ट्या आणि लग्नाच्या वरातींमध्ये हे गाणे वाजते आहे. विशेष म्हणजे रागिणी कवठेकरने हे गाणे पुरेशा ठसक्यात आणि नखऱ्यात सादर केले आहे. शशांक कोंडविलकर यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याचे संकलन सुधांशु झा यांनी केलं आहे.