‘भाग्य दिले तू मला’ च्या सेटवर, विरंगुळा म्हणून...

‘भाग्य दिले तू मला’ च्या सेटवर, विरंगुळा म्हणून निवेदिता सराफचे पियानो वादन (On The Sets Of ‘Bhagya Dile Tu Mala’ Nivedita Saraf Plays Piano During The Break)

कलर्स मराठीवरील ‘भाग्य दिले तू मला’ ही मालिका सध्या बरीच गाजत आहे. कावेरी आणि राजवर्धनमधील वाद असो, छोटी मोठी भांडणं असो वा मतभेद असो… पण मालिकेमध्ये अजून एक नातं प्रेक्षकांना खूप आवडत आहे आणि ते म्हणजे रत्नमाला आणि कावेरी यांचं… रत्नमाला ही भूमिका आपल्या सगळ्यांच्या लाडक्या निवेदिता सराफ साकारत आहेत. त्यांचा प्रोमो आल्यापासून प्रेक्षक त्यांच्या भूमिकेसाठी खूपच उत्सुक होते.

परंपरेची कास कधीच न सोडलेल्या, त्याचा अभिमान असलेल्या रत्नमाला हे खूप मोठे प्रस्थ आहे, मोठ्या उद्योजिका आहेत… जमिनीवर राहून देखील आकाशाला गवसणी घालता येते, यावर त्यांचा विश्वास आहे. रत्नमाला यांना त्यांच्या उद्योगाचा डोलारा यशस्वीरित्या पुढे घेऊन जाण्यासाठी, राजवर्धनमध्ये बदल घडवून आणण्यासाठी तसेच त्यांच्यासारखीच संस्कृतीला धरून चालणारी मुलगी हवी आहे. त्या अशा मुलीच्या शोधात आहेत. आणि याचदरम्यान त्यांची आणि कावेरीची भेट होते.

आता मालिकेमध्ये रत्नमाला यांच्या मध्यस्तीने कसे कावेरी आणि राजचे नाते फुलेल? कावेरीच्या मदतीने राज आणि रत्नमाला कसे जवळ येतील हे बघायला मिळेलच. परंतू हे मालिकेमध्ये सुरु असताना कलाकारांची सेटवर बरीच धम्माल मस्ती सुरू असते. निवेदिता ताईंनी सेटवर सीन सुरू असताना मध्ये मिळालेल्या वेळेमध्ये एक वाद्य वाजवले (पियानो), ज्याचे व्हिडिओ बरेच व्हायरल होत आहेत.