पठाण चित्रपटावर होत असलेल्या बहिष्काराच्या मागण...

पठाण चित्रपटावर होत असलेल्या बहिष्काराच्या मागणीवर शाहरुख म्हणाला, मला फरक पडत नाही….(On The Demand For Boycott Of Pathan Film, Shahrukh Says, I Don’t Care)

अभिनेता शाहरुख खान 4 वर्षांनी चित्रपटात पुनरागमन करणार आहे. सर्वात शेवटी तो झिरो या चित्रपटात दिसला होता. आता 4 वर्षांनी शाहरुखचा पठाण हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री दीपिका पादुकोणही दिसणार आहे. नुकतेच या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. पण या गाण्यामुळे आता वादाची ठिणगी पडली आहे.

गेले काही दिवस बॉलिवूडवर बहिष्कार घालण्याची मागणी वाढली आहे. अशातच आता या गाण्यामुळे पठाण चित्रपटावर सुद्धा बहिष्कार घालण्याची मागणी मोठ्याप्रमाणावर होत आहे. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकीनी घातल्यामुळे वादाला तोंड फुटले. या गाण्यातून भगव्या रंगाचा अपमान केल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. आता या प्रकरणावर शाहरुखान याने आपले मौन सोडले असून ट्रोलर्सना प्रत्यूत्तर दिले आहे.

कोलकता आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शाहरुख म्हणाला की, सोशल मीडिया हे माध्यम बरेचदा विशिष्ट दृष्टीकोनातून चालवले जाते. नकारात्मकता सोशल मीडियाचा वापर वाढवते असे मी कुठेतरी वाचले आहे. अशा प्रयत्नांमुळे सामुहिक जीवनात फूट पडते. जग काहीही करो, फरक पडत नाही, आमच्यासारखे लोक कायम सकारात्मक राहतील.

शाहरुख आणि दीपिकाचा पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे प्रदर्शित झाले. पण दीपिकाच्या बिकीनीमुळे या चित्रपटासंबंधी वाद निर्माण झाला. अनेक हिंदू संघटनांनी दीपिकाने परिधान केलेल्या बिकीनीला खूप विरोध केला आहे.