आज इंजिनियर्स डे ! इंजिनियर झाले, तरी पण बॉलिवू...

आज इंजिनियर्स डे ! इंजिनियर झाले, तरी पण बॉलिवूडमध्ये स्थिरावलेले कलाकार (On Engineers Day : Meet Bollywood Actors Who Were Engineers Before Entering Into Films)

आज जगभर इंजिनियर्स डे साजरा केला जात आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात कर्तबगारी गाजवणाऱ्या या लोकांचे ठिकठिकाणी गौरव होत आहेत. त्यांच्या कार्याची दाखल घेतली जात आहे. आपल्या बॉलिवूडमध्ये काही कलाकार असे आहेत, जे मूळचे इंजिनियर आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का? इगजिनीयरिंगचे रूक्ष क्षेत्र सोडून हे कलावंत बॉलिवूडमध्ये स्थिरावलेत

सुशांत सिंह राजपूत
सुशांत आज या जगात राहिला नाही, परंतु त्याने देशव्यापी इंजिनीयरिंग प्रवेश परीक्षेत सातवी श्रेणी मिळवली होती. नंतर त्याने दिल्लीच्या टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीतून मेकॅनिकल इंगजीनियरिंगचा कोर्स केला. पण तिथे त्याचं  मन रमलं  नाही . तो अभिनय क्षेत्रात आला.

Engineers Day, Bollywood Actors


कार्तिक आर्यन
डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मलेला कार्तिक अभ्यासात पुढेच होता. त्याने नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील इंजिनीयरिंग कॉलेजातून चांगली बायोटेकनॉलॉजी मध्ये डिग्री मिळवली आहे.

Engineers Day, Bollywood Actors

विकी कौशल
‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटातील भूमिकेसाठी नॅशनल ऍवॉर्ड मिळवलेला विकी कौशल, लहानपणापासूनच अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहत होता. पण त्याचा वडिलांना मात्र वाटत होतं की , त्याने   इंजिनीयर व्हावं. म्हणून त्याने वडिलांची मर्जी राखत मुंबईच्या राजीव गांधी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी  या कॉलेजातून इलेकट्रोनिक आणि टेलिकम्युनिकेशन या विषयात इंजिनीयरिंगची पदवी मिळवली.

Engineers Day, Bollywood Actors

तापसी पन्नू
देखण्या तापसी पन्नूने इंजिनियर म्हणून पदवी मिळवली आहे. तिने कम्प्यूटर सायन्समध्ये इंजिनियरींग केले आहे.

Engineers Day, Bollywood Actors

सोनू सुद
उत्तम अभिनेता आणि उमदा माणूस असलेल्या सोनू सुदने लोकडाऊनच्या काळात मोठी लोकसेवा केली आहे. हा सोनू मुळाचा इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहे. आधी तो इलेक्ट्रीक इंजिनियर होता. पण ते सगळं सोडून तो अभिनेता झाला.

Engineers Day, Bollywood Actors


कृती सेनन
‘हिरोपंती’ या चित्रपटातून,टायगर श्रॉफची नायिका म्हणून बॉलिवूडमध्ये दाखल झालेली कृती देखील मूळची इंजिनियर आहे. तिने इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन या विषयात बी.टेक हि डिग्री मिळवली आहे.

Engineers Day, Bollywood Actors

रितेश देशमुख
रितेशची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकारण्यांची आहे. पण तो लहानपणापासून अभ्यासात हुशार होता. त्याने सिव्हिल इंजिनियरिंग केले आहे. पण त्यात करियर करण्याऐवजी त्याने अभिनय क्षेत्रात मोठे नाव कमावले आहे.

Engineers Day, Bollywood Actors

आर. माधवन
माधवन देखील लहापानापासून अभ्यासात हुशार होता. त्याला स्कॉलरशिप मिळाली होती. माधवन ने मद्रासच्या कॉलेजातून मेकॅनिकल इंजिनियर हि पदवी मिळवली आहे. पण त्या क्षेत्रातील रुक्षता सोडून तो या मायावी नगरीत आला.

Engineers Day, Bollywood Actors