अभिषेक बच्चनचा ४५ वा वाढदिवसः अमिताभसह मान्यवरा...

अभिषेक बच्चनचा ४५ वा वाढदिवसः अमिताभसह मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा (On Abhishek Bachchan’s 45th Birthday : Papa Amitabh Bachchan And Celebs Wishes Him)

अभिषेक बच्चनच्या ४५ व्या वाढदिवशी, त्याचे पापा अमिताभ बच्चन यांनी २ फोटो शेअर केले आहेत. त्यापैकी अभिषेकच्या बालपणाचा आहे, तर दुसरा मोठेपणीचा. त्यामधील एका फोटोत अमिताभने अभिचा हात धरला आहे, तर दुसऱ्यात अभिने, अमिताभचा हात धरला आहे. हे फोटो शेअर करून, भावुक होत अमिताभने लिहिले आहे, हॅप्पी बर्थडे अभिषेक. त्यापुढे ५ फेब्रुवारी ही तारीख टाकली आहे.

फोटो सौजन्यः इन्स्टाग्राम

या फोटोंसोबत अमिताभने छान ओळी लिहिल्या आहेत. मी त्याचा हात धरून रस्ता दाखवला होता, आता तो माझा हात धरून मला रस्ता दाखवतो. या ओळींसह बिग बी यांनी हार्टवाले इमोजी पण पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून चाहत्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चनने आपल्या ब्लॉगवर ब्लॅक ॲन्ड व्हाईट फोटो शेअर केला आहे. तो अभिषेक जन्माला आला, त्या दिवसाचा आहे. त्यासोबत अमितजींनी लिहिलं आहे, ”या जगात आल्यावर काही क्षणानंतरचा फोटो. आज मला खूप शुभेच्छा लाभल्या व या जगाशी तुझं नातं जुळलं.”

फोटो सौजन्यः इन्स्टाग्राम


अभिषेकला सोशल मीडियावर खूप शुभेच्छा मिळाल्यात. अजय देवगणने दोघांचा फोटो शेअर करीत लिहिलं, “हॅपी बर्थडे डिअर अभिषेक. विश यू द व्हेरी बेस्ट टूडे ॲन्ड ऑलवेज्‌.”

फोटो सौजन्यः इन्स्टाग्राम

कतरिना कैफने पण फोटो शेअर करून अभिला शुभेच्छा दिल्या आहेत.

फोटो सौजन्यः इन्स्टाग्राम

अभिषेकची बहीण श्र्वेता बच्चन-नंदा हिची मुलगी नव्यानवेली नंदा हिने आपल्या मामाला शुभेच्छा देत लिहिलं, ”हॅपी बर्थडे बेस्ट फ्रेंड. आप मेरे पसंदीदा फॅमिली मेंबर हैं. मेरे क्राइम पार्टनर भी है.”

फोटो सौजन्यः इन्स्टाग्राम

अभिषेक आपला ४५वा वाढदिवस साजरा करतोय्‌. दिग्दर्शक जे.पी. दत्ता यांच्या ‘रिफ्युजी’ या चित्रपटापासून त्याने आपले फिल्मी करिअर सुरू केले. चित्रसृष्टीत त्याला जवळपास २० वर्षे झाली आहेत. या काळात त्याने अनेक हिट चित्रपट दिलेत व आपलं नाव कमावलं. ‘द बिग बुल’ हा अभिषेकचा आगामी चित्रपट असून त्यामध्ये तो स्टॉक ब्रोकर हर्षद मेहताची भूमिका करीत आहे.