राज कुंद्रा प्रकरणात कलाटणी? शिल्पा शेट्टी राज ...

राज कुंद्रा प्रकरणात कलाटणी? शिल्पा शेट्टी राज कुंद्राला सोडचिठ्ठी देणार का? जाणून घ्या, नेमकं काय घडतंय्‌…(OMG: So Will Shilpa Shetty Give Divorce To Raj Kundra? Know What Is The Whole Matter)

Shilpa Shetty, Divorce, Raj Kundra

राज कुंद्राला पॉर्नोग्राफी चित्रपटांच्या प्रकरणात अटक झाल्यापासून त्याची बायको – अभिनेत्री शिल्पा शेट्टीला फार लाजिरवाणे जीवन जगावे लागत आहे. तिच्या बाबतीत प्रश्नचिन्हे उमटू लागली आहेत. तरीपण तिच्या चाहत्यांचा तिच्यावर पूर्ण विश्वास दिसून आला आहे. त्यामुळेच टी.व्ही. च्या रिॲलिटी शो मध्ये तिने पुनरागमन केले, तेव्हा त्यांनी तिचे स्वागतच केले आहे.

Shilpa Shetty, Divorce, Raj Kundra

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

राज कुंद्राने तयार केलेल्या पॉर्न व्हिडिओज्‌मधून कित्येक नामांकित अभिनेत्रींची नावे समोर आलीत. त्याने मीडियावर चर्चेला उधाण आलं. आता शिल्पा शेट्टीच्या खासगी जीवनाबद्दल उलटसुलट चर्चा होताना दिसते आहे. शिल्पा शेट्टी राज कुंद्राला सोडचिठ्ठी देणार असल्याच्या तयारीत आहे, असं बोललं जात आहे.

Shilpa Shetty, Divorce, Raj Kundra

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शिल्पा शेट्टीच्या संदर्भात ही बातमी किती खरी आहे, याबद्दल आम्ही नक्की काही सांगू शकत नाही. पण मीडिया रिपोर्टस्‌ पाहता शिल्पाने मुलांसहित राज कुंद्रापासून अलग होण्याचा निर्णय घेतलेला दिसतो आहे. आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल ती जास्त चिंतीत आहे. त्यांचे चांगले संगोपन व्हावे, यासाठी तिने हा निर्णय घेतला आहे. आपला हा निर्णय ती कधीही अंमलात आणू शकते, असे बोलले जात आहे. मात्र खुद्द शिल्पा शेट्टीकडून याबाबत काही निवेदन अद्याप आलेले नाही.

Shilpa Shetty, Divorce, Raj Kundra

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

आधी प्रेम, आणि नंतर प्रदीर्घ काळ एकमेकांशी डेटिंग करून विवाहबद्ध झालेले राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी आपल्या संसारात चांगलेच सुखी होते. पण या एका आरोपाने त्यांच्या संसारात वादळ आलं. अन्‌ त्यांची घडी विस्कटली. त्यातच आता शिल्पा शेट्टी, राज कुंद्रापासून अलग होण्याच्या बातमीने मीडियावर कल्लोळ माजला आहे.

Shilpa Shetty, Divorce, Raj Kundra

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

अलिकडेच शिल्पा शेट्टीने आपल्या इन्स्टाग्राम हॅन्डलवर एक पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये हॉलिवूडची प्रख्यात अभिनेत्री सोफिया लॉरेन हिच्या लेखनातील मजकूर तिने दिला होता. त्याचा आधार घेऊन तिने आपल्या हातून चुका झाल्या असल्याची कबुली दिली होती. चुकांमधून काही शिकणं आवश्यक आहे, अशा तऱ्हेचा मजकूर त्यात होता.

Shilpa Shetty, Divorce, Raj Kundra

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शिल्पा शेट्टीची ही पोस्ट फारच व्हायरल झाली होती. त्या पाठोपाठ शिल्पा, आपला पती राज कुंद्रा याच्यापासून अलग होणार असल्याची वार्ता मीडियामध्ये पसरते आहे. या बातमीत किती तथ्यांश आहे, ते येणारा काळच ठरवेल.