पांढऱ्या रंगाचा सलवार-सूट, कपाळावर टिळा, अन् हा...

पांढऱ्या रंगाचा सलवार-सूट, कपाळावर टिळा, अन् हातात पुजेचं ताट घेऊन आई काजोलसोबत सिद्धिविनायकाच्या मंदिरात दिसली न्यासा, न्यासाचं हे अलग रुप पाहून नेटकऱ्यांनी चांगलेच फटकारले (Nysa Devgn Visits Siddhivinayak Temple With Mom Kajol, See Pictures)

बॉलिवूड स्टारकिड्स नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. गेले काही दिवस न्यासा देवगण बोल्ड लूक आणि लेट नाईट विविध पार्ट्यांमुळे बरीच प्रसिद्धी पावली आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला न्यासाने तिच्या मित्रमैत्रिणींसोबत बॅक-टू-बॅक पार्टी केली आणि सगळ्यांचं लक्ष स्वतःकडे वेधलं होतं. पार्टीतील न्यासाचा बोल्ड अंदाज पाहून नेटकरी थक्क झाले होते. आता पुन्हा एकदा न्यासा तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे. मात्र यावेळी तिला कुठल्याही पार्टीत नाही तर मंदिराबाहेर पाहिलं गेलं.

गेल्या काही महिन्यांत न्यासा देवगणचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळालं. न्यासा आता पहिल्यापेक्षा अधिक बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात दिसते. सोशल मीडियावरही तिला मोठा चाहतावर्ग आहे. या पार्टीतील तिचे लूक सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आज सकाळी ती सिद्धिविनायक मंदिरात गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचली. त्यावेळी तिच्यासोबत अजय देवगण आणि आई काजोलसुद्धा होती. न्यासाने यावेळी पांढऱ्या रंगाचा सलवार-सूट परिधान केला होता.

तिचा असा अंदाज पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला पुन्हा ट्रोल केलंय. ‘पू बनी पार्वती’ या काजोलच्या प्रसिद्ध डायलॉगने न्यासाची खिल्ली उडवली गेली. ‘नवीन वर्षाच्या पार्टीत खूप धमाल केली, आता बॉलिवूडमध्ये लाँच होण्याआधी थोडी तरी नीट वाग- असं काजोल म्हणाली असेल’, अशीही कमेंट एका युजरने केली. 31 डिसेंबरच्या पार्टीनंतर काजोलची इच्छा नाही की तिने ओरहानसोबत राहिलं पाहिजे. कारण त्यामुळे देवगण कुटुंबाची प्रतिमा मलिन होतेय’, असंही नेटकऱ्याने म्हटलंय.

न्यू इअर पार्टीतील न्यासाचा लूक आणि तिचा बोल्ड अंदाज अजय देवगणच्या चाहत्यांना फारसा पसंत पडला नव्हता. ‘हिने आईवडिलांचं नावच खराब केलं’, अशी टीका एका युजरने केली होती. तर ‘ही पूर्ण नशेतच आहे वाटतं’ असं दुसऱ्याने लिहिलं होतं. न्यासा एक टक्कासुद्धा तिच्या आईसारखी नाही, असंही नेटकऱ्यांनी लिहिलं होतं.