नूतनची नात व मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन आहे खूप...

नूतनची नात व मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन आहे खूपच ग्लॅमरस : पाहा तिचे फोटो (Nutan’s Granddaughter And Mohnish Bahal’s Daughter Pranutan Is Very Glamorous, See Her Cute Pics.)

मोहनीश बहलची मुलगी आणि महान अभिनेत्री नूतन हिची नात प्रनूतन हिचा अलीकडेच २८ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. मोहनीशने दोन चित्रपटांत सलमान खानच्या साध्याभोळ्या मोठ्या भावाच्या भूमिका केल्या होत्या. अन्‌ नूतन तिच्या सोज्वळ प्रतिमेबाबत प्रख्यात होती. पण प्रनूतन मात्र फारच ग्लॅमरस आणि बोल्ड आहे. हे पाहा तिचे ग्लॅमरस फोटो.

प्रनूतन अभिनेत्री झाली आहे. तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

मोहनीश बहल सलमान खानचा अगदी निकटवर्गीय आहे. दोघे चांगले मित्र आहेत. त्यामुळे मोहनीशची मुलगी प्रनूतनला सलमानने आपल्याच निर्मिती संस्थेतून संधी दिली. तिच्या पहिल्या चित्रपटाचे नाव होते ‘नोटबूक’.

चित्रपट फारसा चालला नाही. परंतु प्रनूतनच्या अभिनयाची प्रशंसा झाली.

यावर्षी तिचा ‘हेलमेट’ हा चित्रपट प्रदर्शित होईल. नृत्य, गाणी, विनोद, रोमांस यांनी परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात तिचा नायक अपारशक्ती खुराना आहे.

प्रनूतन काही जाहिरातींमधूनही चमकली आहे.

अद्याप तिच्या करिअरने गती घेतलेली नाही, पण तिच्या सौंदर्याची चर्चा होत असते.

आपली आजी नूतन हिच्याप्रमाणेच प्रनूतन दिसायला सुंदर आहे. तिची पहिली झलक पाहताच लोकांनी ही जाणीव झाली होती. आपली आई नूतन हिचे प्रतिरुप समजून मोहनीशने तिचे नाव प्रनूतन ठेवले आहे.

इन्स्टाग्रामच्या माध्यमातून प्रनूतन आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. आपले फोटो ती इथे शेअर करत राहते.

प्रनूतन अतिशय ग्लॅमरस, स्टायलिश आणि बोल्ड अभिनेत्री आहे. आणि तिची ही बोल्ड इमेज इन्स्टाग्रामवर झळकत असते.

प्रनूतनने कायद्याची पदवी घेतली आहे. पण तिला वकिली करण्याची आवड नाहीये. अभिनय क्षेत्रातच तिला करिअर करायचे आहे.

मोहनीश बहलने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो आपल्या दोन्ही मुलींच्या बाबतीत अतिशय प्रोटेक्टिव्ह आहे. आपल्या मुलींवर असलेली त्याची माया सोशल मीडियावर नेहमीच दिसते.

फोटो सौजन्य: Instagram @pranutan

कंगनाचे भयंकर वादग्रस्त ट्वीट : म्हणते – टॉयलेट स्वच्छ केले नाही तर गांधीजी आपल्या पत्नीला घराबाहेर काढत