पोस्टरवर काली मातेच्या हातात सिगरेट पाहून भडकली...

पोस्टरवर काली मातेच्या हातात सिगरेट पाहून भडकली नुसरत जहां : धर्माला विकाऊ गोष्टी बनवू नका (Nusrat Jahan Reacts To Leena Manimekalai’s Kaali Poster Controversy, Says Religious Sentiments Shouldn’t Be Hurt)

‘काली’ या डॉक्युमेंट्री फिल्मचा पोस्टर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. निर्मात्या लीना मिण‍मेकलई यांनी या पोस्टरमध्ये देवी काली माता सिगरेट ओढताना आणि एका हातात  LGBTQ चा झेंडा पकडताना दाखवली आहे. हा पोस्टर रिलीज झाल्यावर सोशल मीडियावर खूप गदारोळ माजला आहे. या पोस्टरमुळे लीना विरोधात लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. हे प्रकरण इतके वाढले की कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांनीही या प्रकरणी निवेदन जारी केले आहे.

या प्रकरणी आता अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहाँने धर्माला विकणारी गोष्ट बनवू नका अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नयेत असा तिचा बोलण्याचा अर्थ आहे.

चित्रपट निर्मात्या लीना मणिमेकलाई यांनी त्यांच्या ‘काली’ या डॉक्युमेंट्री फिल्मचे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरमध्ये चार हात असलेल्या काली मातेच्या वेषात एक मुलगी दिसत आहे. पोस्टरमध्ये ती एका हाताने सिगारेट ओढत आहे, तर दुसऱ्या हातात ती LGBTQ समुदायाचा झेंडा धरून आहे. काली मातेला अशा प्रकारे सिगारेट ओढताना दाखवल्याने सोशल मीडियावर याविषयी संताप व्यक्त केला जात आहे. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल लीनाला अटक करण्याची मागणीही यूजर्स करत आहेत.

या वादावर अभिनेत्री नुसरतने एका मुलाखतीत तिचे मत व्यक्त केले. ती म्हणाली की, धर्माला मध्येच आणू नका. तो विकण्याजोगा बनवू नका. रूममध्ये बसून संपूर्ण मसालेदार चित्रपट पाहणे खूप सोपे आहे. मी नेहमीच कलाकौशल्यांना , व्यक्तिमत्त्वांना स्वतंत्रपणे समर्थन दिले आहे . पण माझ्या मते कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ नये ही गोष्टसुद्धा तितकीच महत्वाची आहे.

नुसरत पुढे म्हणाली की, असे पोस्टर बनवणे पूर्णपणे चुकीचे आहे, अशा प्रकारे एखाद्याच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, अशा पोस्टर्सद्वारे देवांचा खेळ मांडणे या गोष्टीदेखील चुकीच्या आहेत.  “मी कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू शकत नाही, कारण मी माझा धर्म माझ्या पद्धतीने पाळते. तुम्ही एखादी गोष्ट कलात्मकरित्या करत असाल तर ती तुमची जबाबदारी आहे. तुम्ही बरोबर किंवा चुकीचे हे मी ठरवणार नाही, पण मी कलाकौशल्य आणि धर्म वेगळे ठेवते आणि तेच योग्य आहे.

नुसरतने स्वतः 2 वर्षांपूर्वी अशाच वादात अडकली होती. दोन वर्षांपूर्वी तिने दुर्गा मातेसारखा पोशाख घालून खास फोटोशूट केले होते आणि ते सोशल मीडियावर शेअर केले होते, त्यामुळे तिला ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते.