नुसरत भरूचाने महिलांना दिला असा काही सल्ला जो ऐ...

नुसरत भरूचाने महिलांना दिला असा काही सल्ला जो ऐकून नक्कीच हैराण व्हाल ! (Nushrratt Bharuccha gives such advice to women, You Will Also Be stunned To know)

अभिनेत्री नुसरत भरूचा (Nushrratt Bharuccha)च्या अभिनयातील करियरची सुरुवात ही छोट्या पडद्यावरुन झाली. पण ती फ्लॉप ठरली. मात्र मोठ्या पडद्यावर येऊन तिचे नशीब पालटले. सध्या ती इंडस्ट्रीतल्या टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. तिने तिच्या करियरमध्ये अनेक उत्तम सिनेमांमध्ये काम केले. आता ती तिच्या येऊ घातलेल्या नव्या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

‘जनहित में जारी’ हा तिचा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी कंडोम विकल्यामुळे नुसरत ट्रोल झाली होती. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी नुसरतने महिलांना काही उपदेशाचे डोस पाजले आहेत.

‘जनहित में जारी’ या चित्रपटात नुसरत भरूचा आणि अनुद ढाका मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या मते हा चित्रपट लोकांचा दृष्टीकोन नक्कीच बदलेल. या चित्रपटात अवैध गर्भपात, कंडोमसंदर्भातील अफवा आणि वाढती लोकसंख्या यावर भाष्य केले आहे. या चित्रपटात नुसरत ‘नीती’ हे पात्र साकारत आहे. नीती कंडोम बनवणाऱ्या कंपनीमध्ये सेल्सगर्ल म्हणून काम करत असते.

काळ कितीही पुढे गेला असला तरी आजही सेक्स या विषयावर बोलायला लोक कचरतात. अशातच एक मुलगी सेल्स गर्ल बनून कंडोम विकते ही गोष्ट नक्कीच हैराण करणारी आहे. ज्या समाजात कंडोम हा शब्दसुद्धा वर्ज्य आहे तिथे एक मुलगी जाऊन ते विकणे म्हणजे एक संघर्षच म्हणावा लागेल. पण एवढे सगळे असूनही सेल्स गर्ल बनलेल्या नुसरतने लोकांची मने जिंकली आहेत.

नुसरतच्या मते, कंडोमच्या जाहिराती आपण अनेकदा पाहतो, पण त्यात नेहमी पुरुषांचा दृष्टीकोन दाखवला जातो. या चित्रपटातून पुरुषांच्या दृष्टीकोनाचा विचार बदलला जाऊ शकतो, कारण सेक्स दरम्यान कंडोमचा वापर करणे जितके पुरुषांसाठी आवश्यक असते तितकेच महिलांसाठीसुद्धा आवश्यक आहे.

नुसरतने महिलांना काही उपदेश केले जे काहींना पटले तर काहींना ते ऐकून हैराण व्हायला झाले. नुसरत म्हणते की, जर एखाद्या पुरुषाला कंडोम खरेदी करायचा नसेल तर जेव्हा मुली सॅनेटरी नॅपकिन आणायला जातात, त्यावेळी त्यांनी सोबत कंडोमसुद्धा आणावा. कारण ते आपल्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. कंडोमचा वापर न केल्यास महिलांना नको असलेल्या गर्भधारणेचा सामना करावा लागतो. आपल्या देशात सतत वाढणारी लोकसंख्या ही या गोष्टीचा पुरावा आहे की आपल्याकडे असुरक्षित शारीरिक संबंध ठेवले जातात.

एवढेच नाही तर नुसरत पुढे म्हणाली, सेक्स दरम्यान पुरुषाने एखादे वेळी कंडोम वापरला नाही तर त्याचा त्याला काही फरक पडत नाही. पण त्यामुळे एखादी स्त्री प्रेग्नेंट होऊ शकते. तसे झाल्यास तिच्या शरीरात एक मोठे हार्मोनल परिवर्तन घडते. अचानक गरोदर राहिल्यामुळे काहीजणींना गर्भपात करावा लागतो. पण ते हेल्दी आहे का? गर्भपातामुळे महिलांचे केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक स्वास्थ्य देखील बिघडते.

नुसरतच्या मते, अधिकांश पुरुषांना महिलांच्या भावना आणि शारीरिक समस्या याने काहीही फरक पडत नाही. ते त्या बाबतीत तितकेसे संवेदनशील नसतात. त्यामुळेच महिलांनी सॅनेटरी पॅडसोबतच कंडोम खरेदी करण्यास संकोच बाळगण्याची गरज नाही, असे ती म्हणते.

(फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)