कोणतं करिअर निवडू? (Numerology Guidelines To Op...

कोणतं करिअर निवडू? (Numerology Guidelines To Opt A Career)

Numerology Guidelines, Career

माझी मुलगी लीना आता कॉलेजमध्ये शिकतेय. तिची जन्मतारीख 8 ऑगस्ट 1998 आहे. कॉलेजमध्ये असूनही तिचा मित्रपरिवार खूपच लहान आहे. याचं सर्वांत मोठं कारण म्हणजे तिचं अबोल असणं. ती घरीही जास्त बोलत नाही. स्वतःच्या विश्‍वात असते. तिची आम्हाला खूप काळजी वाटते. कृपया मार्गदर्शन करा.

 • कावेरी खरे, पुणे
  लीनाची जन्मतारीख 8 आहे. म्हणजे तिचा जन्मांक 8 आहे. तिच्यावर शनीचा प्रभाव आहे. शनीचा प्रभाव असलेल्या या जन्मांकाच्या व्यक्ती बरेचदा कोणत्या ना कोणत्या तणावाखाली असतात. लहानशा कारणाने नाराज होतात, नकारात्मक विचार करतात. त्यांना झटपट निर्णय घेता येत नाही, इतरांशी सहज संवाद साधता येत नाही, स्वतःच्या
  भावना व्यक्त करता येत नाही. या सर्व कारणांमुळे त्या एकलकोंड्याही असतात. हा प्रभाव कमी करण्यासाठी लीनाला गुरूची उपासना, अथर्वशीर्षाचं नियमित पठण करायला सांगा. सोबत तिच्यामधील सकारात्मकता, इच्छाशक्ती वाढीस लागेल यासाठी प्रयत्न करा. यामुळे तिच्यात नक्कीच फरक पडेल.

माझी जन्मतारीख 12 डिसेंबर 2000 आहे. माझा जन्मांक आणि भाग्यांक किती आहे, कृपया सांगाल का?

 • तेजस्वी देऊळकर, मालवण
  केवळ जन्मदिवसाच्या आकड्याची एक अंकी बेरीज म्हणजे ‘जन्मांक’ आणि संपूर्ण जन्मतारखेची एक अंकी बेरीज म्हणजे ‘भाग्यांक’ होय. अर्थात, तुमच्याबाबत जन्मदिवस 12 = 1+2 = 3, म्हणजे 3 हा तुमचा जन्मांक आहे, तर 1+2+0+3+2+0+0+0 = 8, म्हणजे
  8 हा तुमचा भाग्यांक आहे.

यंदा मी दहावीत आहे. दहावीनंतर करिअरसाठी कोणतं क्षेत्र निवडावं,
हे मला कळतच नाही. कधी कधी याबाबत मला काळजी वाटते. माझी जन्मतारीख
26 फेब्रुवारी 2002 आहे. कृपया आपण मला माझ्यासाठी उत्तम असलेली करिअर क्षेत्रं सुचवाल का?

 • निशांत मोरे, मुंबई
  निशांत, खरं तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही. तू आत्तापासून करिअरचा विचार करतो आहेस, हे चांगलं आहे; पण त्याचं टेन्शन घेऊ नकोस. दहावीचा अभ्यास मन लावून कर. हे बघ, तुझा जन्मांक 8 आहे आणि भाग्यांक 5. त्यानुसार तुझ्यामध्ये बोलण्याची उत्तम कला आहे, त्यामुळे तू वकिली किंवा ऑडिट करू शकशील. शिवाय आठ हा शनीचा अंक आहे, तो लोखंडासंबंधी क्षेत्रात लाभ मिळवून देतो, तेव्हा तुझ्यासाठी मॅकॅनिकल किंवा लोखंडासंबंधी क्षेत्रंही चांगली आहेत.