आयुष्मान खुरानाने सामाजिक संदेश देणारे चित्रपट ...

आयुष्मान खुरानाने सामाजिक संदेश देणारे चित्रपट करण्यास दिला नकार, अभिनेत्याने सांगितले यामागचे कारण(Now Ayushmann Khurrana Does Not Want To Do Films With Messages, The Actor Told The Reason For This)

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना आपल्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. आपल्या चित्रपटातून त्याने स्वतःची वेगळी आणि खास ओळख निर्माण केली आहे. आयुष्मानचा प्रत्येक चित्रपट कोणत्या ना कोणत्या सामाजिक संदेशावर आधारित असतो. पण आता आयुष्मान खुरानाला सामाजिक संदेश देणाऱ्या चित्रपटांपासून दूर राहायचे आहे. यामागचे कारणही खुद्द अभिनेत्यानेच सांगितले आहे.

आता लवकरच आयुष्मान खुराना ‘अ‍ॅन अॅक्शन हिरो’मध्ये टिपिकल अॅक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे, या चित्रपटासाठी तो स्वतः आणि त्याचे चाहते खूप उत्सुक आहेत. आयुष्मान म्हणाला,“मी अॅक्शन हिरो नाही. मी पारंपरिक अभिनेता होऊच शकत नाही. म्हणूनच मी जे काही करेन ते थोडे वेगळे असेल.”

विशेष म्हणजे आयुष्मान खुरानाने स्वतःला अॅक्शन हिरो बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी त्याने मिक्स मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षण घेतले आहे. तो प्रसिद्ध अभिनेता जॅकी चॅनचा मोठा चाहता आहे.

आयुष्मान म्हणाला, “मला आता मसाला चित्रपट करायचे आहेत. मला फक्त सामाजिक संदेशांपासून दूर राहून पॉपकॉर्न एंटरटेनमेंट चित्रपट करायचे आहेत. “आमचे प्रेक्षक विभागले गेले आहेत. बौद्धिकतेच्या पलीकडे, आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांपर्यंत पोहोचायचे आहे आणि हे एक मोठे आव्हान आहे.

इतकेच नाही तर आयुष्मान पुढे म्हणाला, “मी सुरुवातीपासून मल्टीप्लेक्स अभिनेता आहे. आता मला कमर्शियलकडे झुकायचं आहे. प्रेक्षकांची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या सतत फ्लॉप होणाऱ्या बॉलिवूड चित्रपटांबद्दल आयुष्मान म्हणाला, “माझ्या मते एका स्क्रिप्ट लेखकाला अभिनेत्यापेक्षा जास्त मानधन मिळायला हवे. कारण संपूर्ण चित्रपटाचा भार लेखकावर असतो. आता ती वेळ आली आहे. कलाकरांनी प्रोड्युसर फ्रेंडली असले पाहिजे.”