आता करोडो रुपये घेणाऱ्या आलिया भट्टला पहिल्या स...

आता करोडो रुपये घेणाऱ्या आलिया भट्टला पहिल्या सिनेमासाठी मिळाले होते फक्त १५ लाख(Now A Days Alia Bhatt Charges In Crores For A Film, But She Was Paid Only 15 Lakh Rupees For Her First One)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या तिच्या ‘डार्लिंग’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतुक होत आहे. याआधी ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटासाठीही तिने वाहवा मिळवली होती. आता तर ती हॉलिवूडमध्येही दिसणार आहे. हार्ट ऑफ स्टोन या चित्रपटातून ती हॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

आलियाने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून आपल्या अभिनयातील करीअरला सुरुवात केली होती. याच चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळाली. पण या चित्रपटासाठी तिने किती पैसे घेतले ते तुम्हाला माहित आहे का ? नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.

आलिया भट्ट ही प्रसिद्ध चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि अभिनेत्री सोनी राजदान यांची मुलगी आहे. तिने वयाच्या १९ व्या वर्षी पहिला चित्रपट साईन केला होता.

या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका होत्या. या चित्रपटासाठी आलियाला किती रुपयांचा चेक मिळाला, याचा खुलासा तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत केला आहे.

एका वृत्तपत्राला मुलाखत देताना आलियाने सांगितले की, ‘स्टुडंट ऑफ द इयर’साठी तिला 15 लाख रुपये मिळाले होते. मात्र ते पैसे तिने न वापरता तो चेक सरळ तिने आपली आई सोनी राजदान यांच्याकडे सुपूर्द केला.

या चित्रपटासाठी आलियाने ५०० लोकांमधून ऑडिशन दिली होती. त्यानंतरच तिची शनाया या पात्रासाठी निवड झाली. या भूमिकेसाठी आलियाने २० किलो वजन घटवले होते.