तुझ्या हास्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही असे म्ह...

तुझ्या हास्यापेक्षा मौल्यवान काहीच नाही असे म्हणत नवाजुद्दीन सिद्दीकीने पहिल्यांदाच शेअर केला मुलीचा फोटो(Nothing more precious than your smile, Nawazuddin shares daughter’s rare pic, Have you seen?)

बॉलिवूडमध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवला आहे.नवाज नेहमीच आपले व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य वेगळे ठेवतो. त्याने नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याला प्रसिद्धीपासून दूर ठेवले आहे.

तसेच नवाजने कधीच आपल्या कुटुंबाचा फोटो शेअर केलेला नाही. पण यावेळी नवाजुद्दीनने आपल्या मुलीचा फोटो शेअर केला असून तो सध्या खूप व्हायरल होत आहे. चाहते त्याच्या मुलीचे कौतुक करत आहेत.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या मुलीचे नाव शोरा असून ती दिसायला खूपच सुंदर आहे. डॉटर्स डेच्या निमित्ताने अनेक कलाकार आपल्या मुलींचे फोटो शेअर करुन त्यांना शुभेच्छा देत होते. यावेळी नवाजला सुद्धा आपल्या लेकीचा फोटो शेअर करण्याचा व तिला शुभेच्छा देण्याचा मोह आवरला नाही.

त्यामुळे त्याने एक सुंदर फोटो शेअर केला आहे. किंबहुना नवाजच्या लेकीचे नाव शोरा आहे हे पहिल्यांदाच सर्वांना समजले. आपल्या मुलीचा फोटो शेअर करण्याची नवाजची ही पहिलीच वेळ आहे, पण चाहत्यांसाठी ती एखाद्या व्हिज्युअल ट्रीटपेक्षा कमी नाही.

या फोटोमध्ये नवाजुद्दीन सिद्दीकीची मुलगी शोरा इतकी गोड दिसत आहे की तिचा गोडवा चाहत्यांची मनं जिंकत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्याने कॅप्शनमध्ये “शोरा, तुझ्या स्मित हास्यापेक्षा अधिक मौल्यवान काहीही नाही. हॅपी डॉटर्स-डे” असे लिहिले.

नवाजुद्दीनच्या या पोस्टनंतर शोराबद्दल जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक आहेत.नवाजच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास नुकतेच त्याच्या बोन या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले. याशिवाय त्याचे ‘टिकू वेड्स शेरू’, बोले चुडियाँ, अफवा, द म्युझिक टीचर, फर्जी, फ्रेट फ्लाइट, फोबिया 2, रोम रोम में यांसारखे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.