समुद्र किनारी वाइन ग्लास हाती घेऊन न्यासा देवगण...

समुद्र किनारी वाइन ग्लास हाती घेऊन न्यासा देवगण करतेय मजा… ग्रीसमध्ये सहलीता आनंद घेतानाचे फोटो व्हायरल (‘Not Us Living Our Best Life???’ Writes Nysa Devgan As She Shares Sun-Kissed Photo From Her Greece Vacation… See New Stunning Pictures)

अजय देवगण आणि काजोलची लाडकी लेक न्यासा देवगण सध्याची सर्वाधिक चर्चेत असलेली स्टार कि़ड झाली आहे. तिने अजून मॉडेलिंग किंवा बॉलिवूड विश्वात प्रवेशही केलेला नाही परंतु तरीही तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे.

न्यासा लंडनमधून तिचे शिक्षण घेत आहे. सध्या ती पार्टी आणि व्हेकेशन मूडमध्ये पाहायला मिळते. सध्या ती तिच्या मित्रांसोबत ग्रीसमध्ये सहलीचा आनंद घेत आहे.

ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिथले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकत्याच शेअर केलेल्या एका फोटोत ती समुद्रकिनारी बसून वाइनचा आनंद घेत आहे. या पोस्टला तिने, सर्वोत्तम लाइफ जगत आहे असे कॅप्शन दिले.

याआधी तिने तिच्या मित्र परिवारासोबत पार्टीत डान्स करतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तर एका फोटोत तिने तिचा चेहरा मेन्यू कार्ड पाठी लपवलेला.