कंगणा रणावत व्यतिरिक्त या कलाकारांनाही मिळाली आ...

कंगणा रणावत व्यतिरिक्त या कलाकारांनाही मिळाली आहे सरकारकडून सुरक्षा (Not Only Kangana Ranaut, These 4 Stars Of Bollywood Have Also Got Security From The Government)

बॉलिवूडची क्विन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कंगना रणावतला सरकारने y+ श्रेणी सुरक्षा प्रदान केली आहे. कंगनाच्या वडिलांनी अभिनेत्रीला संरक्षण देण्याची मागणी केली होती. त्यासाठी पत्र लिहून त्यांनी आपली मुलगी कंगनाला धमकावले जात असल्याची माहिती दिली होती, त्यानंतर कंगनाला सरकारकडून संरक्षण मिळाले. पण बॉलिवूडमध्ये असे आणखी 4 कलाकार आहेत, ज्यांना सरकारकडून संरक्षण मिळाले आहे.

सलमान खान Y+ सुरक्षा

 चाहत्यांमध्ये भाईजान म्हणून प्रसिद्ध असलेला सुपरस्टार सलमान खानला Y+ सुरक्षा मिळाली आहे. पंजाबमधील प्रसिद्ध गायक सिद्धू मुसेवाला यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर जून महिन्यात सलमान खानचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले, ज्यामध्ये सलमान खानची अवस्था सिद्धू मूसेवालासारखी होईल, असे लिहिले होते. त्यामुळे मुंबई पोलीस सतर्क झाले असून सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. अशातच आता त्याला महाराष्ट्र सरकारकडून Y+ सुरक्षा मिळाली आहे.

अक्षय कुमार x सिक्युरिटी

 बॉलिवूडमध्ये खिलाडी कुमार म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमार याच्या नागरिकत्वाबद्दल अनेकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यासाठी अनेकदा त्याला धमक्याही मिळाल्या आहेत. त्यामुळे अक्षय कुमारला महाराष्ट्र सरकारने एक्स श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे.

अनुपम खेर x सिक्युरिटी

 अनुपम खेरचा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’ प्रदर्शित झाल्यानंतर काश्मीर खोऱ्यात हिंदूंवर होणारे अत्याचार या चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटाला लोकांचे खूप प्रेम मिळाले, मात्र त्यानंतर अभिनेते अनुपम खेर यांना धमक्या मिळू लागल्या. या कारणास्तव महाराष्ट्र सरकारने अनुपम खेर यांना एक्स श्रेणीची सुरक्षा दिली आहे.

शत्रुघ्न सिन्हा Y+ सुरक्षा

2018 मध्ये शत्रुघ्न सिन्हा यांच्या जीवाला धोका असल्याची भीती सुरक्षा यंत्रणांना वाटत होती. त्यामुळे त्यांना सरकारने Y+ सुरक्षा दिली होती. विशेष म्हणजे अभिनयासोबतच शत्रुघ्न सिन्हा राजकारणातही सक्रिय आहेत.