मलायकाने होकार दिला पण अर्जुन कपूरला नव्हे! (No...

मलायकाने होकार दिला पण अर्जुन कपूरला नव्हे! (Not Arjun Kapoor But Malaika Arora Has Said ‘Yes’ To Him, Know What Is The Whole Matter)

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या नात्याच्या बातम्या नेहमीच चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी लवकरच हे जोडपे लग्नबंधनात अडकणार असल्याचे म्हटले जात होते. मलायकाने आपल्या इन्स्टा अकाउंटवर एक पोस्ट शेअर करुन आपल्या चाहत्यांना संभ्रमात टाकले होते. त्यामुळे चाहत्यांनीही तिला लग्नासाठी शुभेच्छा देण्यास सुरुवातही केली होती. मलायकाच्या पोस्टमुळे तिने अर्जुनशी लग्न केले असल्याला लोकांना समज झाला. मात्र आता अभिनेत्रीने आपल्या दुसऱ्या पोस्टद्वारे आपण असे काही करणार नसल्याचे गुपित उघड केले आहे.

 मलायका अरोरा अर्जुनसोबत लग्न करणार असल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यामागे कारणही तसेच आहे. अभिनेत्रीने आपल्या इस्टाग्रामवर स्वतःचा एक लाजतानाचा   फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, “मी हो म्हणाले.” आता अशा कॅप्शनमुळे तिने अर्जुनसोबत लग्नाला होकार दिल्याचा लोकांनी अंदाज बांधला.

पण काही काळानंतर मलायकाने ती लग्न करणार नसल्याचे सांगत आपण ती पोस्ट एका नव्या प्रोजेक्ट संदर्भात टाकल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे आता ती लग्नात नव्हे तर एका नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मलायका अरोराने दुसऱ्या पोस्टद्वारे माहिती दिली की, “मी माझा नवीन रिअॅलिटी शो ‘मूव्हिंग विथ मलायका’साठी डिस्ने प्लस हॉटस्टारला हो म्हटले आहे. जिथे तुम्ही मला खूप जवळून जाणू शकाल. हा शो ५ डिसेंबरपासून सुरू होत आहे. अशात मलायकाने अनोख्या पद्धतीने आपल्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली.