आलिया-प्रियंका नव्हे, संजय भन्साली यांची पहिली ...

आलिया-प्रियंका नव्हे, संजय भन्साली यांची पहिली ‘गंगुबाई’ होती, राणी मुखर्जी (Not Alia Bhatt or Priyanka Chopra, if I Rani Mukerji was the first choice for Sanjay Leela Bhansali’s ‘Gangubai Kathiawadi’)

‘गंगूबाई काठियावाडी’ या आलिया भट्ट अभिनित चित्रपटाचा फर्स्ट लूक व टिजर प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे आलिया एकदम वेगळी दिसते आहे.
टिजरची खूपच तारीफ चालू आहे.

टिजरच्या सुरुवातीस निवेदक सांगतो – कामाठीपुऱ्यामध्ये कधीच अमावस्येची रात्र नसते. कारण तिथे गंगू राहते. आलियाची एंट्री देखील एकदम झकास आहे. ती म्हणते – गंगू चांद थी और चांद रहेगी.

हा चित्रपट आलियाच्या करिअरचा मैलाचा दगड ठरेल, असं बोललं जात आहे. पण संजय लीला भन्साली यांची या भूमिकेसाठी ती पहिली पसंत नव्हती. आलियाच्या आधी प्रियंका चोप्राला ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. तरीपण भन्साली यांची पहिली पसंत राणी मुखर्जी होती.


राणी मुखर्जीला घेऊन ‘गंगूबाई’ बनवणार होते.

होय. हाती आलेल्या वृत्तानुसार, भन्साली यांनी या चित्रपटाची आखणी केली होती, तेव्हा ते प्रमुख भूमिका राणी मुखर्जीला देऊ पाहत होते. पण काही कारणांनी ते जमलं नाही.

राणीनंतर प्रियंकाला ऑफर देण्यात आली.

राणीशी जमलं नाही म्हणून भन्साली यांनी प्रियंकाला या भूमिकेसाठी विचारलं. तेव्हा प्रियंका त्यांच्याच ‘बाजीराव-मस्तानी’चं शूटिंग करत होती. पण तिच्या तारखा नव्हत्या. शिवाय ती हॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी धावपळ करत होती. म्हणून भन्साली यांचं हे प्रोजेक्ट तात्पुरतं थांबलं.

‘इंशा अल्लाह’ गुंडाळला म्हणून आलियाला मिळाला…

याच दरम्यान आलिया आणि सलमान खान या जोडीचा ‘इंशा अल्लाह’ हा चित्रपट गुंडाळला गेला. भन्सालींकडे आलियाच्या डेटस्‌ होत्याच, म्हणून त्यांनी ‘गंगूबाई काठियावाडी’साठी तिला घेतलं. हा चित्रपट त्यांनी कमी वेळात बनवला आहे.

हुसैन झैदी यांच्या पुस्तकावर आधारित…

साठाव्या शतकातल्या माफिया क्विनवर हा चित्रपट आधारित आहे. एका तरुणीस बळजबरीने वेश्याव्यवसायात ढकलले जाते. ती कामाठीपुऱ्यात कोठा चालवते. हुसैन झेदा यांच्या ‘माफिया क्विन ऑफ मुंबई’ या पुस्तकावरून हा चित्रपट बेतला आहे.

कोण होती गंगूबाई?

मुंबईच्या कामाठीपुरा या वेश्यावस्तीत कोठा चालविणारी ती धैर्यवान बाई होती. मुळात ती गुजराथमधील एक भोळीभाबडी मुलगी होती. तिला वेश्याव्यवसायात ढकलण्यात आलं. नंतर हीच गंगूबाई, माफिया क्विन गंगूबाई काठियावाडी म्हणून नावारूपास आली. मुंबईचा डॉन करीम लालापर्यंत तिची ओळख होती. पुढे गंगूबाईने वेश्यांसाठी पुष्कळ काम केलं. मुंबईच्या आझाद मैदानात भाषण देताना गंगूबाई बोलली होती – कामाठीपुऱ्यात जर बायका नसतील तर मुंबईचे रस्ते बायकांसाठी असुरक्षित होतील. या चित्रपटाचा टिजर बघून लक्षात येत आहे की, आलिया भट्टने या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे.