३ वर्षात एकही सिनेमा नाही, तरी अनुष्का शर्माची ...

३ वर्षात एकही सिनेमा नाही, तरी अनुष्का शर्माची संपत्ती २६० कोटी रुपये (Not A Single Film Released In Last 3 Years, Still Anushka Sharma Has Assets Worth 260 Crores)

अव्वल क्रिकेटपटू विराट कोहलीशी लग्न व नंतर आलेले बाळंतपण या कारणांनी अभिनेत्री अनुष्का शर्मा चित्रवर्तुळाच्या बाहेरच आहे. या कारणांनी गेल्या ३ वर्षात तिचा एकही सिनेमा आला नाही, किंवा ती चित्रण करतेय्‌ याचीही काही खबर नाही. असं असलं तरी तिच्याकडे गडगंज संपत्ती आहे. सुमारे २६० कोटी रुपयांची संपत्ती तिच्याकडे आहे, असा अंदाज वर्तविला जात आहे.

फोर्बस मासिकाने अनुष्का शर्माचा, सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री या यादीत समावेश केला आहे. अन्‌ कोट्याधीशांच्या या यादीत तिची संपत्ती ३५ मिलीयन डॉलर्स असल्याचे म्हटले आहे. त्याचे भारतीय रुपयांमध्ये रुपांतर, अंदाजे २६० कोटी होते.

अनुष्का शर्मा तशी घरची श्रीमंत होती. सुरुवातीला तिने मॉडेलिंग क्षेत्रात मुशाफिरी केली. त्यामध्ये मोठमोठ्या ब्रॅण्डच्या जाहिरातींसाठी तिने मॉडेलिंग केले. तिथून तिच्या कमाईला सुरुवात झाली. नंतर ती सिनेसृष्टीत अवतरली, तिच शाहरूख खानची नायिका म्हणून. त्यानंतर तिच्या यशाचा आलेख चढतच गेला आणि तिने सिनेमात आघाडीची अभिनेत्री म्हणून बरेच पैसे मिळवले. पण एवढ्यानेच तिची संपत्ती वाढलेली नाही.

अनुष्काने स्वतःची निर्मिती संस्था काढली. त्याद्वारे चित्रपट निर्माण करून बक्कळ कमाई केली. सिनेनिर्माती म्हणून तिने जवळपास ८० टक्के नफा कमवला असे बोलले जाते.

अनुष्का शर्माने २०१४ साली मुंबईत आलिशान घर घेतले. त्याची व सजावटीची अंदाजे किंमत ९ कोटी रुपये. तिच्या वापरात बीएमडब्लू, मर्सिडीज्‌, रोवल अशा महागड्या मोटारगाड्या आहेत. शिवाय तिने रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक केली असून त्यामध्ये ३६ कोटी रुपयांची संपत्ती आहे. ती एका सिनेमासाठी, साधारणपणे १२ कोटी रुपये, तर जाहिरातपटासाठी ४ कोटी रुपये मिळवत होती.

२०१८ साली तिचा ‘झिरो’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये शाहरूख खान व कतरीना कैफ होते. त्यानंतर ३ वर्षात तिने काहीही काम केले नाही. आपली मुलगी वामिकाच्या संगोपनात ती रमली आहे. तरी तिची स्थावर जंगम मालमत्ता २६० कोटी रुपयांची आहे.