सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीवर लावले नवे आरोप, ...

सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेहीवर लावले नवे आरोप, म्हणाला नोरा जॅकलीनवर जळायची आणि…(Nora was jealous of Jacqueline and was always brainwashing me against her’ Sukesh Chandrashekar claims in his new letter, conman once again showers love on Jacqueline)

नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे काही दिवसांपासून चर्चेत होत्या. याप्रकरणी नोरा फतेहीने जॅकलीन फर्नांडिसविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे. 200 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात आपले नाव जबरदस्तीने वापरण्यात आल्याचा दावा नोराने केला आहे. तर, या प्रकरणात तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखरने एक पत्र लिहून जॅकलीनचा बचाव केला आहे आणि नोरावर अनेक आरोप केले आहेत.

नोरा फतेही आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्यातील वादाच्या संदर्भात सुकेशने हे पत्र तुरुंगातून लिहिले आहे. सुकेशने दावा केला आहे की नोराची इच्छा होती की मी जॅकलीनला सोडावे. ती अनेकदा मला जॅकलीनबद्दल भडकवायची.

सुकेशने या पत्रात लिहिले – जॅकलीन आणि मी गंभीर नात्यात होतो. यामुळे नोराला जॅकलीनचा हेवा वाटू लागला होता. ती जॅकलीनविरुद्ध मला भडकवायची आणि माझे ब्रेनवॉश करायची. नोराची इच्छा होती की मी जॅकलीनला सोडून तिला डेट करायला सुरुवात करावी,” सुकेशने पुढे लिहिले, “नोरा मला दिवसातून किमान 10 वेळा कॉल करण्याचा प्रयत्न करत असे आणि जर मी तिच्या कॉलला उत्तर दिले नाही तर ती माझ्यावर कॉल करण्यासाठी दबाव आणत असे.

सुकेशने आपल्या पत्रात लिहिले आहे की, ती जॅकलीनवर जे आरोप करत आहे ते सर्व तिच्या बनावट कथा आहेत. “नोरा खोटे बोलली की तिला माझ्याकडून कार गिफ्ट घ्यायची नव्हती. माझ्यासोबत तिने स्वतःसाठी गाडी निवडली. मला तिला रेंज रोव्हर भेट द्यायची होती, पण तेव्हा ती उपल्ब्ध नव्हती. म्हणून मी त्याला एक एस सीरीज BMW कार भेट दिली. जी तिने तिच्याकडे बराच काळ ठेवली होती. एवढेच नाही तर नोरा मला महागड्या बॅग आणि दागिन्यांचे फोटो पाठवत असे. जे मी तिच्यासाठी घेतले होते. ती अजूनही त्यांचा वापर करत आहे. त्यामुळे नोराने खोटे बोलू नये. सुकेशने या पत्रात दावा केला आहे की, नोराने मोरोक्कोमध्ये घर घेण्यासाठी आपल्याकडून मोठी रक्कमही घेतली आहे. या पत्रात सुकेशने चाहत खन्ना आणि निक्की तांबोळी यांच्याशी असलेल्या आपल्या नात्याबद्दलही स्पष्टीकरण दिले आहे आणि म्हटले आहे की त्यांचे संबंध केवळ व्यावसायिक स्तरावर होते.

नुकतेच जॅकलीनने कोर्टात सुकेशवर अनेक आरोप केले होते. सुकेशने या पत्रात तिचा उल्लेखही केला आणि जॅकलीनवर त्याचे प्रेम असून तिच्याविरुद्ध कधीही बोलू शकत नाही, असे म्हटले आहे. त्याने लिहिले, “तिने माझ्याबद्दल जे काही लिहिले त्यावर मी भाष्य करणार नाही कारण मी तिच्यावर प्रेम करतो आणि तिचा आदर करतो. ती नेहमीच माझ्या आयुष्याचा एक भाग असेल.” जॅकलीनवर प्रेमाचा वर्षाव करत सुकेशने लिहिले की, “काहीही असो, मी तिच्या पाठीशी उभा राहून तिची निर्दोषता सिद्ध करेन, जॅकलीनशिवाय, जर कोणी मला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न केला तर मी कायदेशीर लढाई लढेन.”